esakal | नमाज पठणाची चारशे वर्षांची परंपरा खंडित ! औरंगजेबकालीन ईदगाह मैदान दुसऱ्या वर्षीही सुनेसुने
sakal

बोलून बातमी शोधा

Eidgaah

नमाज पठणाची चारशे वर्षांची परंपरा खंडित ! औरंगजेबकालीन ईदगाह मैदान दुसऱ्या वर्षीही सुनेसुने

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : रमजान (Ramjan Eid) महिन्यातील 30 दिवसांच्या कडकडीत रोजाच्या समाप्तीनंतर मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावरील औरंगजेबकालीन ईदगाह मैदानावरील (Eidgah ground of Aurangzeb period) नमाज पठणाची (Namaz recitation) 400 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे खंडित झाली. मुस्लिम बांधवांच्या अनुपस्थितीमुळे यंदा ईदगाह मैदान सुनेसुने दिसून आले. (The 400-year-old tradition of reciting Namaz at the Eidgah ground during Aurangzeb's rule is broken for the second year in a row)

मंगळवेढा शहरातील विविध प्रभागांत असलेल्या मशिदी व ईदगाह मैदानांवर रमजान महिन्याच्या समाप्तीचे नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतु शासनाने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जमावबंदी व संचारबंदीचे आदेश दिल्यामुळे सध्या सर्वच धर्मीयांच्या विविध सणांवर मोठी संक्रांत आली. त्यामुळे त्यांना आपले सण व विधी घरातच साजरे करावे लागले.

हेही वाचा: तब्बल 21 वर्षांनंतर मिळाले म्हैसाळ योजनेचे पाणी ! नागरिकांचा जल्लोष

दरवर्षी तालुक्‍यात दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परंतु कोरोनाचा दूध विक्रीसह बाजारपेठेतील रमजान खरेदीवर परिणाम जाणवला. त्यामुळे मोठ्या उत्साहाऐवजी अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी करावी लागली. अशा परिस्थितीत शहर व ग्रामीण भागातील सिद्धापूर, मरवडे, डोणज, नंदूर, सलगर बुद्रूक, भोसे, नंदेश्‍वर, आंधळगाव, खुपसंगी, खोमनाळ, निंबोणी, बावची, मारोळी, लवंगी, हुन्नूर, गोणेवाडी, डोंगरगाव, ब्रह्मपुरी, माचणूर, लक्ष्मी दहिवडी, भाळवणी, रड्डे आदी गावांतील नागरिकांनी आपापल्या घरात नमाज पठण करून चांगला पाऊस व पीकपाणीसह सध्या जगावर घोंघावणाऱ्या कोरोनापासून मुक्ती व सर्व समाजातील जनतेला सुखी ठेवण्याची दुवा अल्लाहकडे मागितली.

हेही वाचा: तब्बल 21 वर्षांनंतर मिळाले म्हैसाळ योजनेचे पाणी ! नागरिकांचा जल्लोष

रमजाननिमित्त आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, आवताडे स्पिनिंगचे संजय आवताडे, शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, "युटोपियन'चे उमेश परिचारक, "भैरवनाथ'चे अनिल सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शीला शिवशरण, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, सभापती प्रेरणा मासाळ, माजी सभापती प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्‍वर आवताडे यांच्यासह शशिकांत चव्हाण, मुझ्झमील काझी, गौरीशंकर बुरकूल, सरोज काझी, ऍड. नंदकुमार पवार, तुकाराम कुदळे, ऍड. राहुल घुले, सुहास पवार यांनी मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना रमजना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

loading image