चिमुकलीसह विवाहितेचा खून! आरोपींना जन्मठेप की फाशी? आज फैसला

विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींचा आज न्यायालयात फैसला
विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींचा आज न्यायालयात फैसला
विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींचा आज न्यायालयात फैसलाCanva
Summary

मुलाच्या व शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या मदतीने सासूने सुनेचा निर्घृणपणे खून केला. खुनानंतर धडावेगळे केलेले सुनेचा मृतदेह तोळणूर (ता. अक्‍कलकोट) परिसरातील रेल्वे रुळावर फेकून दिले.

सोलापूर : मुलाच्या व शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या मदतीने सासूने सुनेचा निर्घृणपणे खून (Crime) केला. खुनानंतर धडावेगळे केलेले सुनेचा मृतदेह तोळणूर (ता. अक्‍कलकोट) (Akkalkot) परिसरातील रेल्वे रुळावर फेकून दिले. या गुन्ह्यात मृताचा पती, सासू, शेजारीण व रिक्षाचालकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे (R. N. Pandhare) यांनी दोषी धरले आहे. त्या आरोपींना आता जन्मठेपेची की फाशीची शिक्षा होणार? याचा फैसला आज (मंगळवारी) होणार आहे.

अक्‍कलकोट येथील घाडगे दूध डेअरीसमोरील संजय नगर झोपडपट्टीतील रमजान मन्नू शेखचा विवाह शहनाज हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, रमजान, त्याची आई अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख, शेजारीण शाहीन रहिमान शेख यांनी पाच वर्षांच्या चिमुकलीला जीवे ठार मारून त्या परिसरातील विकास हॉटेलजवळ टाकून दिले. त्यावरून त्यांच्या घरात वारंवार भांडणे सुरू झाली.

विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींचा आज न्यायालयात फैसला
घरफोडीतील आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू! CID करणार सखोल तपास

या भांडणातून रमजान, अम्मा व शाहीन या तिघांनी 2 ऑगस्ट 2018 रोजी शहनाजला जबर मारहाण केली. त्यात शहनाज जखमी होऊन बेशुद्ध पडली. मारहाणीत शहनाजचा मृत्यू झाला आणि त्यांनी शेजारील रिक्षावाला दिलदार तकदीरखॉं सौदागरला बोलावून आणले. मृत शहनाजला त्यांनी रिक्षातून अक्‍कलकोट सरकारी दवाखान्यासमोरील मोकळ्या मैदानात आणले. त्या ठिकाणी आल्यानंतर शाहीनने तिचे दोन्ही पाय तर अम्माने दोन्ही हात पकडले आणि रमजानने एक्‍सा ब्लेडने शहनाजचे मुंडके धडावेगळे केले. त्यानंतर त्यांनी शहनाजचर मृतदेह पोत्यात भरून रमजानच्या दुचाकीवर ठेवला आणि शाहीनच्या मदतीने त्यांनी तोळणूर येथील रेल्वे रुळ गाठला.

रेल्वे अपघात दाखविण्यासाठी त्यांनी खटाटोप केला, परंतु पोलिस तपासात सत्य समोर आले. रेल्वे गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी मृताची खबर अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यास कळविली. त्यानंतर सरकारतर्फे पोलिस हवालदार धनसिंग राठोड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी कसून तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणात 17 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, आरोपींची कबुली, यावर सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्‍तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना दोषी धरले असून, त्यावर आता अंतिम फैसला होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्ही. एस. जाधव यांनी केला तर कोर्टपैरवी म्हणून पोलिस हवालदार डी. वाय. कोळी यांची मदत झाली.

विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींचा आज न्यायालयात फैसला
Solapur : चोरट्याने दुकानातून पळविले काजू, बदाम अन्‌ खाद्यतेल!

निदर्यतेने खून करणाऱ्यांना फाशीच द्यावी

आई व शेजारणीच्या मदतीने पत्नीचा खून करणाऱ्या आणि त्यांना मदत करणारा रिक्षाचालक, या सर्वांनी अतिशय निर्घृणपणे, निदर्यतेने शहनाजचा खून केला आहे. त्यांना जन्मठेप नको तर फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी केली आहे. त्यासंदर्भात आज (मंगळवारी) फैसला होणार असून, न्यायालयाकडे फाशीच्या शिक्षेसाठी आग्रह धरणार असल्याची माहिती ऍड. राजपूत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com