esakal | Solapur : घरफोडीतील आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू! CID करणार सखोल तपास
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीतील आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू! CID करणार सखोल तपास

जुळे सोलापुरातील विजय देशमुख नगरातील घरफोडी प्रकरणी भीमा रज्जा काळे याला पोलिसांनी 22 सप्टेंबरला अटक केली होती.

घरफोडीतील आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू! CID करणार सखोल तपास

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जुळे सोलापुरातील (Jule Solapur) विजय देशमुख नगरातील घरफोडी प्रकरणी भीमा रज्जा काळे (Bhima Kale) (रा. भांबुरे पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा) याला पोलिसांनी (Police) 22 सप्टेंबरला अटक केली. न्यायालयाने त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. मात्र, 24 सप्टेंबरलाच त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला (Civil Hospital) हलविण्यात आले. रविवारी (ता. 3) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला. आता या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीमार्फत (CID) केला जाणार आहे.

हेही वाचा: ''राफेल खरेदी ही शौर्याची नव्हे तर लाजीरवाणी बाब !''

घरफोडीत काहीही संबंध नसताना पोलिसांनी संशय घेऊन माझ्या पतीला अटक केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणल्यानंतर ते नैसर्गिक विधीसाठी जाताना त्यांच्या पायातून रक्‍त पडत होते, असा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. मला सात मुले असून त्यांच्याशिवाय कोणीच नसल्याची परिस्थितीही त्यांनी कथन केली. या प्रकरणी महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, उस्मानाबाद येथील पारधी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "न्याय द्या' म्हणून आंदोलन केले.

तर दुसरीकडे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भीमा काळे याने घरफोडी केल्याने त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. परंतु, 24 तारखेलाच त्याला त्रास होऊ लागला. त्याच्या किडनीवर डायलेसिसचे उपचार सुरू होते. मानसिकदृष्ट्या तो आजारी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी हलविले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून त्याला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचेही विजापूर नाका पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Solapur : चोरट्याने दुकानातून पळविले काजू, बदाम अन्‌ खाद्यतेल!

घडलेली हकीकत...

  • जुळे सोलापुरातील विजय देशमुख नगरातील घरफोडीनंतर विजापूर नाका पोलिसांनी सुरू केला तपास

  • घरफोडी प्रकरणात पोलिसांनी भीमा रज्जा काळे याला 22 सप्टेंबरला केली अटक

  • जिल्हा न्यायालयाने भीमा काळेला दिली होती 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

  • पोलिस कोठडीत असताना भीमा काळेला अशक्तपणा, किडनीचा त्रास होऊ लागला

  • 24 सप्टेंबरला पोलिसांनी त्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) केले दाखल

  • दवाखान्यात उपचारासाठी दाखल असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी मिळू शकली नाही

  • सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झाला भीमा काळेचा रविवारी (ता. 3) मृत्यू; पत्नीने केला पोलिसांवर आरोप

  • पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी आता सीआयडी करणार पुढील तपास

  • महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्यासोबत नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन

loading image
go to top