पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने अखेर तिसरा खून केलाच !

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने अखेर तिसरा खून केलाच !
Crime-Scene
Crime-SceneSakal
Updated on
Summary

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी हा पॅरोलवर जेलबाहेर आला होता. आल्यापासून त्याच्या हत्याराला धार लावत होता अन्‌ जाहीरपणे म्हणत होता, की मला अजून दोन खून करायचे आहेत.

सोलापूर : वडापूर येथील ज्ञानदेव प्रभू नागणसुरे (वय 55) हे सोमवारी (ता. 18) दुपारी सायकलीवर गवताचा भारा घेऊन घराकडे निघाले होते. या वेळी रस्त्यालगत आमसिद्ध भीमा पुजारी जनावरे चारत होता. नागणसुरे यांना पाहताच आमसिद्ध पुजारी याने रस्त्यात गाठून त्यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्‍यावर, मानेवर व गुडघ्यावर वार (Crime) केले. या हल्ल्यात नागणसुरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Crime-Scene
बनावट डिझेल! पालघरच्या साई ओम पेट्रोने केमिकल आणले कोठून?

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी आमसिद्ध पुजारी हा पॅरोलवर जेलबाहेर आला होता. तो तुरुंगातून आल्यापासून त्याच्या हत्याराला धार लावत होता अन्‌ जाहीरपणे म्हणत होता, की मला अजून दोन खून करायचे आहेत. अन्‌ अखेर आरोपीने चारित्र्यावर संशय घेत सोमवारी दुपारी तिसरा खून केलाच. ज्ञानदेव नागणसुरे (वय 55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर आमसिद्ध पुजारी (वय 65, रा. वडापूर) असे आरोपीचे नाव आहे.

हल्ल्यानंतर आमसिद्ध पुजारी हा शांतपणे घरी गेला. म्हैस दावणीला बांधली आणि रक्ताने माखलेले कपडे बदलून फरार झाला, अशी माहिती पुढे आली आहे. याआधी आरोपीने सात वर्षांपूर्वी स्वत:च्या पत्नीचा पहाटे डोक्‍यात दगड घालून खून केला होता. पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घ्यायचा. या खुनाच्या गुन्ह्यात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो पॅरोलवर गावात आला होता. आल्यापासून तो दररोज हत्यार घासून तिसऱ्या खुनाची जणू वाटच पाहात होता. नागणसुरे याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. याबाबत अलीकडे तो नेहमीच तशी वाच्यता करत होता. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी मंद्रूप पोलिस ठाण्यात दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

Crime-Scene
काकांची हौस! पुण्याहून हेलिकॉप्टरने आणून लावले पुतणीचे लग्न

आमसिद्ध पुजारी याने 15 वर्षांपूर्वी अंत्रोळी येथील लक्ष्मण सलगरे नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. आपल्या पत्नीशी सलगरे याचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. जेलमधील वर्तणूक चांगली असल्याने त्याच्या शिक्षेत कपात झाली आणि तो बाहेर आला. त्यानंतर काही महिन्यात त्याने पत्नीच्या डोक्‍यात दगड घालून खून केला आणि सतः पोलिसात हजर झाला होता. दहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. दुसऱ्या गुन्ह्यातही त्याला पुन्हा जन्मपेठेची शिक्षा झाली. अलीकडेच तो पॅरोलवर गावात आला होता. आल्यापासूनच ज्ञानदेव नागणुरे यांचे नाव जाहीरपणे घेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com