esakal | जिल्ह्यात "या' 137 गावांनी उडवली प्रशासनाची झोप! प्रत्येक गावात शंभरपेक्षा अधिक रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19

दहा तालुक्‍यांतील 1011 गावांपैकी 137 गावांमध्ये शंभरहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या गावांवर फोकस करीत प्रशासनाने लोकांचे टेस्टिंग वाढवून पोलिस कारवाईवर जोर दिला आहे.

जिल्ह्यातील "या' 137 गावांनी उडवली प्रशासनाची झोप !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेची सुरवात झाल्यानंतर हॉटस्पॉट ठरणाऱ्या गावांची यादी जिल्हा परिषदेने तयार केली. त्यानुसार जिल्ह्यातील अक्‍कलकोट (Akkalkot) वगळता अन्य 10 तालुक्‍यांतील एक हजार 11 गावांपैकी 137 गावांमध्ये शंभरहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या गावांवर फोकस करीत प्रशासनाने त्या गावांतील लोकांचे टेस्टिंग वाढवून पोलिस (Police) कारवाईवर जोर दिला. त्यामुळे आता त्या बहुतांश गावांमधील रुग्णसंख्या आटोक्‍यात येण्यास मदत झाली आहे. (Outbreaks of corona were reported in 137 villages in the Solapur district)

हेही वाचा: होम आयसोलेशनमधील 32 वर्षीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू !

जिल्ह्यातील एक हजार 142 गावांपैकी जवळपास दीडशे गावे कोरोनामुक्‍त झाली आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत त्याच गावांमध्ये रुग्णवाढ का होत आहे, याचा अभ्यास आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आला. त्यातील बहुतेक गावे राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तेथील सरपंच, ग्रामसेवक व तलाठ्यांना सक्‍त निर्देश देत आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी वाढविली. तसेच कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवून रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार केले. तर 50 पेक्षा जास्त, त्यापेक्षा कमी व 25 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावांची यादी तयार करून पोलिसांना देण्यात आली. त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई वाढविली. त्यामुळे आता या गावांतील नागरिक सुरक्षित झाले असून, तेथील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आला आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यात लहान- मोठी 132 गावे असून त्यापैकी समर्थनगर (85) आणि कडबगाव (80) याशिवाय अन्य कोणत्याही गावात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले नाहीत.

हेही वाचा: परीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर! सोलापूर विद्यापीठाची कामगिरी

रुग्णांची शंभरी पार केलेली गावे...

  1. माळशिरस तालुका : यशवंतनगर, माळशिरस, माळीनगर, माळेवाडी, शिंदेवाडी, निमगाव, संग्रामनगर, सदाशिवनगर, वेळापूर, नातेपुते, अकलूज, गुरसाळे, बोरगाव, मांडवे, महाळूंग, लवंग, करूंदे, इस्लामपूर, पिसेवाडी, जाबूंड, मोरोची, तांदूळवाडी, पानीव, पिलीव, पिंपरी, संगम, चाकोरे, खंडाळी, दहिगाव, फोंडशिरस, धर्मपुरी, श्रीपूर.

  2. उत्तर सोलापूर : बिबीदारफळ, नान्नज, वडाळा, कळमण, पाकणी, कोंडी, मार्डी, तिऱ्हे, हिप्परगा.

  3. माढा : भोसरे, मानेगाव, दारफळ, निमगाव मा., उपळाई बु. व खुर्द, मोडनिंब, बैरागवाडी, तुळशी, अरण, भुताष्टे, परिते, वरवडे, पिंपळनेर, निमगाव टें, कुर्डू, टेंभुर्णी, अकोले खु., कन्हेरगाव, रांझणी, माढा.

  4. मोहोळ : आष्टी, पेनूर, खंडाळी, शेटफळ, अनगर, मोहोळ.

  5. सांगोला : सांगोला, वाटंबरे, यलमार मंगेवाडी, कडलास, महूद, जवळा.

  6. दक्षिण सोलापूर : मंद्रूप, होटगी

  7. मंगळवेढा : मारापूर, पाटकूल, भोसे, बोराळे, दामाजीनगर, मरवडे

  8. करमाळा : देवळाली, करमाळा, वीट

  9. बार्शी : वैराग, पांगरी, बावी

  10. पंढरपूर : गादेगाव, उपरी, कोर्टी, तिसंगी, वाखरी, सोनके, खेड भाळवणी, शिरढोण, कौठाळी, चळे, गोपाळपूर, मुंडेवाडी, तावशी, एकलासपूर, सिद्देवाडी, खर्डी, टाकळी ल., बोहाळी, शेटफळ, तन्हाळी, तुंगत, मगरवाडी, तारापूर, सुस्ते, शेगाव दुमाला, अजनसोंड, देगाव, रोपळे, आढीव, गुरसाळे, होळे, खेडभोसे, भोसे, मेंढापूर, पांढरेवाडी, भनवळी, जैनवाडी, पळशी, पिराचीकुरोली, भंडीशेगाव, शेळवे, रांझणी, ओझेवाडी, सरकोली, आंबे, फुलचिंचोली, करकंब.