esakal | मुख्यमंत्र्यांच्या आषाढीच्या महापुजेला धनगर समाजाचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या आषाढीच्या महापुजेला धनगर समाजाचा विरोध

मराठा आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यत असतानाच धनगर समाजानेही आरक्षण मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनाच इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आषाढीच्या महापुजेला धनगर समाजाचा विरोध

sakal_logo
By
- भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक दिलेली असतानाच आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. (the dhangar community has also become aggressive in demanding reservation)

हेही वाचा: 'अँटीबॉडी कॉकटेल'नं कोरोनाचा खात्मा! बार्शीतील डॉक्टराने केला यशस्वी प्रयोग

विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेवून त्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडून तो बहुमतांनी सहमत करावा, अशी मागणी धनगर समाजाने केली आहे. आषाढी यात्रेपुर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूनच आषाढीच्या महापुजेसाठी पंढरपुरात यावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्याआषाढीच्या महापुजेला धनगर समाज विरोध करेल, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला.

हेही वाचा: उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकपदी रमेश बारसकर

धनगर आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्याची मंगऴवारी (ता.15) येथील अहिल्यादेवी होळकर वाड्यात बैठक पार पडली. बैठकीनंतर धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक परमेश्वर कोळेकर व अदित्य फत्तेपूरकर यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. सध्या मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. विविध मराठा समाज संघटनांनी राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यत असतानाच धनगर समाजानेही आरक्षण मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनाच इशारा दिला आहे. आरक्षण मागणीवरुन राज्यभरात आंदोलन पेटण्याची शक्यताही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी करणार प्रयत्न

यावेळी परमेश्वर कोळेकर म्हणाले की, येत्या काही दिवसात राज्य सरकार दोन्ही सभागृहाचे विशेष अधिवेशन घेवून त्यामध्ये मराठा समाज आरक्षणाचा ठराव बहुमताने मंजूर करून घेण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनामध्ये राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा ही प्रश्न उपस्थित करावा. 'ढ' आणि 'र' संदर्भात जो संभ्रम आहे. त्याविषयी राज्य सरकारने धनगड नसून धनगर आहेत, असा ठराव बहुमतांनी मंजूर करुन तो अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडे अंमलबजावणीस पाठवावा. मुख्यमंत्र्यांनी तो ठराव मंजूर करुनच आषाढीच्या महापुजेसाठी पंढरपूरला यावे, धनगर समाज मुख्यमंत्र्यांचेच स्वागत करेल. तसे न केल्यास मात्र मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापुजेला धनगर समाज तीव्र विरोध करेल, असा इशाराही  कोळेकर यांनी बैठकीत दिला दिला आहे.

हेही वाचा: पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

बैठकीला शालीवहन कोळेकर, आदित्य फत्तेपुरकर, द्रोणाचार्य हाके, सोमनाथ ढोणे, महेश येडगे, पांडुरंग भेंकी, राजाभाऊ उराडे, पंकज देवकते, बालाजी ऐडगे, संजय लवटे, अण्णा सलगर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (the dhangar community has also become aggressive in demanding reservation)

loading image