पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे सोलापुरातील धनगर समाज नाराज?

पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे सोलापुरातील धनगर समाज नाराज?
Summary

सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच धनगर समाजाला पालकत्व करण्याची संधी धनगर समाजाचे नेते मंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाली आहे

पंढरपूर (सोलापूर) : वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची सोलापूर जिल्हाच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी होण्याची चर्चा सुरू आहे. तसे संकेत राष्ट्रवादीकडून दिले जात आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजामधून (Dhangar community) नाराजी व्यक्त केली जात आहे. या चर्चेनंतर जिल्ह्यातील धनगर समाजातील प्रमुख मंडळींची पंढरपूर येथे अलीकडेच एक प्राथमिक बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये पालकमंत्री बदलण्याच्या विषयावर गांभीर्याने चर्चा झाली आहे. यामध्ये अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. (The Dhangar community in Solapur is expressing displeasure over the talk of changing the Guardian Minister)

पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे सोलापुरातील धनगर समाज नाराज?
मंगळवेढा विकासाला निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच धनगर समाजाला पालकत्व करण्याची संधी धनगर समाजाचे नेते मंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाली आहे. दरम्यान या घडामोडीमध्ये इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात कामाला लागला असल्याची जोरदार चर्चा आहे.

पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे सोलापुरातील धनगर समाज नाराज?
बर्ड फ्लूसाठी सरकारची मदत, पालकमंत्री दत्तात्रय भरणे : चिकन शिजवून खा 

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे, आ. संजय शिंदे हेही सध्या पालकमंत्र्यांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने यांना पालकमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या राजकीय चर्चेमुळे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजातील तरूण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे सोलापुरातील धनगर समाज नाराज?
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांतून भरतीसाठी गुणमर्यादा घटवणार - दत्तात्रय भरणे

राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता असून देखील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. अशातच आता धनगर समाजाचा राज्यात एकमेव मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना पदावरून बाजूला काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. या सगळया राजकीय घडामोडीमुळे राज्यातील धनगर समाजाच्या नाराजीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता ही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे सोलापुरातील धनगर समाज नाराज?
दोन दिवसांत केला जाईल बिबट्याचा बंदोबस्त : पालकमंत्री दत्तात्रय भरणे 

इंदापूरला पाणी नेण्यास अपयश; मामांचा बळी

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात इंदापूरचा बराच भाग समाविष्ट आहे. त्या भागातील मतदारांना खुश करण्यासाठी उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी इंदापूरला पळविण्याचा घाट पवार कुटुंबियांचा होता. त्यासाठी पालकमंत्री भरणे यांना पुढे केले होते, सोलापूर जिल्ह्यातील जागृक संघटनांनी पक्षांनी पवारांचा हा डाव हाणून पडल्यामुळे पवार कुटुंबीय सुद्धा नाराज झाले आहेत. हे अपयश पालकमंत्र्यांच्या माथी मारून या संपूर्ण प्रकरणात पालकमंत्र्यांना बळीचा बकरा बनवण्याचा उद्योग पवार कुटुंब करत आहे. यामुळे भरणे यांचे पालकमंत्री पद काढून घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ही धनगर समाजातील कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत. (The Dhangar community in Solapur is expressing displeasure over the talk of changing the Guardian Minister)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com