"ई-गोरज कट्टा'वर पशुपालकांची गर्दी! दावणीला दिसताहेत सशक्त जनावरे

"ई-गोरज कट्टा'वर पशुपालकांची गर्दी! दावणीला दिसताहेत सशक्त जनावरे
"ई-गोरज कट्टा'वर पशुपालकांची गर्दी! दावणीला दिसताहेत सशक्त जनावरे
"ई-गोरज कट्टा'वर पशुपालकांची गर्दी! दावणीला दिसताहेत सशक्त जनावरेCanva
Summary

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या "ई-गोरज कट्टा'वर महाराष्ट्रातील पशुपालकांच्या पशुधना बाबतीतल्या सर्व अडचणी सोडवल्या जात आहेत.

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : परभणी (Parbhani) येथील पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयाने कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या "ई-गोरज कट्टा'वर (e-Goraj Katta) महाराष्ट्रातील पशुपालकांच्या (Pastoralists) पशुधना बाबतीतल्या सर्व अडचणी सोडवल्या जात आहेत. त्यामुळे या अनोख्या ई-गोरज कट्ट्यावर आता पशुपालकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे दावणीत निरोगी व सशक्त जनावरे दिसू लागली आहेत. (The e-Goraj Katta initiative is addressing animal health issues-ssd73)

"ई-गोरज कट्टा'वर पशुपालकांची गर्दी! दावणीला दिसताहेत सशक्त जनावरे
'उजनी'च्या ऊस पट्ट्यात आता पिकताहेत एक्‍स्पोर्ट क्वालिटीची फळे !

या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय (Dr. Nitin Markandey) यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी गूगल मीटवर सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या ठरलेल्या वेळेत न चुकता शास्त्रज्ञ, पशुवैद्यक, प्राध्यापक व शेतकरी एकाच व्यासपीठावर येतात. या व्यासपीठावर पशुधनाच्या बाबतीत मुक्त संवाद होतो. पशुपालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकारण केले जाते. दुधाळ जनावरांची ओळख, जनावरांचे आजार व उपाय, लसीकरणाचे महत्त्व, जनावरांच्या सवई, कास दाह, गर्भाशयाचे दाह, आहार व खुराक, दूध उत्पादन वाढ याबरोबरोबरच पशुपालकांचे अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न सोडवले जातात.

"ई-गोरज कट्टा'वर पशुपालकांची गर्दी! दावणीला दिसताहेत सशक्त जनावरे
ड्रॅगनफ्रूट लागवडीला 40 टक्के अनुदान ! जाणून घ्या या फळाचे महत्त्व

विशेषतः अभ्यासक्रमाबाहेरच्या अडचणी सोडवल्या जात आहेत. गाय, म्हैस, शेळी- मेंढी व परसातील कुक्कुट पालक या सर्वांना ई-गोरज कट्टा फायदेशीर ठरू लागला आहे. महिला व तरुण उद्योजकांचा यात मोठा सहभाग आहे. या गोरज कट्ट्यावर परभणी पशू विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. सुहास अमृतकर, डॉ. सुमीत वानखेडे, डॉ. सुधीर बोरीकर, डॉ. मीरा साखरे, डॉ. काकासाहेब खोसे, डॉ. म्हाळसाकांत निकम आदी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपलब्ध असतात. या उपक्रमाचे नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कर्नल आशिष पातुरकर यांनी कौतुक केले असल्याचे डॉ. मार्कंडेय यांनी सांगितले.

ई-गोरज कट्ट्याला पशुपालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमचा हा उपक्रम अविरत चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शास्त्रज्ञ व पशुपालक थेट जोडले जात आहेत. या व्यासपीठावर पशुपालकांच्या खऱ्या अडचणी सोडवण्याचा मोठा आनंद मिळतो.

- डॉ. नितीन मार्कंडेय, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी

ई-गोरज कट्टा या गूगल मिटवर दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा आम्हाला खूपच फायदा होतोय. इथे दुधाळ जनावरांचे दूध वाढ तंत्र, क्षार मिश्रण, जनावरांच्या चारा व पाणी देण्याच्या आम्ही वेळा फिक्‍स केल्या. भाकड जनावरे माजावर येऊ लागली. त्यामुळे आमच्या गावातून कत्तलखान्याला जाणाऱ्या अशा अनेक जनावरांचे प्राण या कार्यक्रमातून वाचले.

- पांडुरंग देशमुख, पशुपालक, वैराग, ता. बार्शी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com