अरे व्वा! डाळिंब बांगलादेशला तर केळी आखाती देशांना निर्यात; 23 लाख उत्पन्न

अरे व्वा! डाळिंब बांगलादेशला तर केळी आखाती देशांना निर्यात; 23 लाखांचे उत्पन्न
अरे व्वा! डाळिंब बांगलादेशला तर केळी आखाती देशांना निर्यात; 23 लाखांचे उत्पन्न
अरे व्वा! डाळिंब बांगलादेशला तर केळी आखाती देशांना निर्यात; 23 लाखांचे उत्पन्नCanva
Updated on
Summary

माळशिरस तालुक्‍यातील गट नं. 2 येथील तरुण शेतकऱ्याने सव्वा एकर डाळिंब व दोन एकर केळीच्या निर्यातीतून 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

माळीनगर (सोलापूर) : माळशिरस (Malshiras) तालुक्‍यातील गट नं. 2 येथील तरुण शेतकऱ्याने सव्वा एकर डाळिंब (Pomegranate) व दोन एकर केळीच्या (Banana) निर्यातीतून 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. खराब वातावरणातही त्याच्या शेतातील डाळिंब बांगलादेशला (Bangladesh) तर केळी आखाती देशात (Gulf countries) निर्यात (Export) झाली आहे. त्याने विक्रमी उत्पन्न मिळवून युवा पिढीपुढे फळ शेतीबाबत प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. केशव मालोजी थोरात असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची गट नंबर दोन येथे 15 एकर शेती आहे. त्यामध्ये तो डाळिंब, केळी, ऊस (Sugarcane), अद्रक (Ginger), कांदा (Onion) अशी पिके घेतो. स्वतः शेतात कष्ट करून खत, पाणी, औषधे यांचे वेळेवर नियोजन करतो. सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. शेतीच्या व्यवस्थापनासाठी वडील मालोजी थोरात व भाऊ रमेश यांची त्याला मोलाची साथ लाभते.

अरे व्वा! डाळिंब बांगलादेशला तर केळी आखाती देशांना निर्यात; 23 लाखांचे उत्पन्न
शेतकऱ्याचे मोडले कंबरडे ! टोमॅटोला प्रतिकिलो फक्त 25 पैसे दर

डाळिंब : लागवड ते विक्री

सव्वा एकरात डाळिंबाची भगवा वाणाची 500 झाडे आहेत. डाळिंबाला रासायनिक, सेंद्रिय व जिवाणू खताचा एकात्मिक वापर त्याने केला. केवळ फवारण्यांवर भर न देता पाणी, अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करून झाडाची ताकद वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे बागेत तेल्या असूनसुद्धा वाढला नाही. इतर बुरशीजन्य रोगही नियंत्रणात राहिले. सतत पाऊस पडत असल्यावर कॉपर, सल्फरचे डस्टिंग केले. पहिल्या वर्षीपासून बागेला वर्षातून दोन वेळा गेरू पेस्ट लावल्याने व निमॅटोड नियंत्रण केल्याने सात वर्षांची झाडे असूनही मर रोगाचे प्रमाण खूप कमी झाले. फळांना संरक्षक कागदाचा वापर केला. बागेत तणनाशकांचा वापर केला नाही. फळाचा रंग व आकार चांगला असल्याने निर्यातक्षम डाळिंब तयार झाले. 100 ग्रॅम वजनावरील डाळिंबाला जागेवर 92 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 12 टन डाळिंब 92 रुपये किलो दराने बांगलादेशला निर्यात केले. तसेच दोन टन डाळिंबाची 20 ते 70 रुपये किलो दराने स्थानिक बाजारात विक्री केली. त्याद्वारे सव्वा एकरात 12 लाख चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सव्वा एकराला दोन लाख रुपये खर्च झाला.

अरे व्वा! डाळिंब बांगलादेशला तर केळी आखाती देशांना निर्यात; 23 लाखांचे उत्पन्न
श्रावण विशेष : माळढोक अभयारण्यातील नागनाथ मंदिर ! भक्ती अन्‌ पर्यटनही

केळी : लागवड ते विक्री

दोन एकर क्षेत्रात जी-9 केळीच्या वाणाची 7 बाय 5 अंतराच्या बेडवर लागवड केली होती. त्यातून 73 टन उत्पादन मिळाले. केळीच्या घडाचे वजन 25 ते 40 किलो होते. लागण केलेल्या या केळीला जागेवर 15 रुपये किलो दर मिळून त्याची आखाती देशात निर्यात झाली. त्यातून 10 लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खोडवा केळीची गुणवत्ता चांगली असल्याने बॉक्‍स पॅकिंग करून त्याची उत्तर भारतात विक्री केली. त्यास 12 ते 13 रुपये किलो दर मिळाला. साडेअकरा ते बारा महिन्यांच्या आत केळीचे हार्वेस्टिंग होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. शेणखत व रासायनिक खतांचा वापर केला. दोन एकर केळीसाठी दीड लाख रुपये खर्च झाला. खर्च वजा जाता त्यास डाळिंब व केळीतून 19 लाख 50 हजार रुपयांचे निव्वळ उत्त्पन्न मिळाले.

खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे डाळिंबाला तेल्या व इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेकांच्या बागा फेल गेल्या. मात्र, त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन निघू शकते.

- केशव मालोजी थोरात, युवा शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
A demand has been made to provide five new MSRTC buses to the Mangalwedha ST Depot to improve passenger services.
How will B-2 land regularization benefit Solapur?
Marathi News Esakal
www.esakal.com