सोलापूर जिल्ह्यात 41 हजार मयत मतदार; 22 हजार नवमतदार! Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर जिल्ह्यात 41 हजार मयत मतदार; 22 हजार नवमतदार!
सोलापूर जिल्ह्यात 41 हजार मयत मतदार; 22 हजार नवमतदार!

सोलापूर जिल्ह्यात 41 हजार मयत मतदार; 22 हजार नवमतदार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सूचनेनुसार सोलापूर (Solapur) जिल्ह्यात निवडणूक शाखेच्या वतीने 13 व 14 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या विशेष मतदार नोंदणीत 22 हजार 519 नवे मतदार वाढले असून, आता जिल्ह्याची मतदारांची संख्या 35 लाख 56 हजार 635 गेली आहे. तब्बल 41 हजार 479 मयत मतदारांची (Voters) नावे आढळली आहेत. मयत मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.

हेही वाचा: सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची CBI च्या संयुक्त संचालकपदी निवड

27 व 28 नोहेंबर रोजीच्या विशेष माहिमे दिवशी अर्ज स्वीकारण्यासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच दिव्यांग मतदारांचा शोध घेणे व त्यांना मतदार यादीत चिन्हांकित करणे, व्हीआयपी यांची नावे मार्कड्‌ इलेक्‍ट्रानिक्‍स म्हणून चिन्हांकित करणे तसेच तृतीयपंथी मतदारांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. उत्तर सोलापूर, पंढरपूर, टेंभुर्णी, माढा व बार्शी या ठिकाणी तृतीयपंथी व देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रत्येक ग्रामसभेत वाचन करण्यात आले.

जिल्ह्यात 1 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत मतदार यादी पुन:निरीक्षण कार्यक्रम सुरू राहणार आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत आलेल्या हरकती व दावे 20 डिसेंबर रोजी निकालात काढण्यात येणार आहेत तर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

विशेष मोहिमेत प्राप्त झालेली माहिती

 • मयत मतदार : 41789

 • कायम स्थालंरित संख्या : 3571

 • लग्न होऊन बाहेरगावी गेलेले : 4036

 • लग्न होऊन गावात आलेले : 3517

 • 18 वर्ष पूर्ण झालेले : 8139

 • दिव्यांग व्यक्ती : 4922

 • अधिक भागामध्ये नाव असलेल्या मतदारांची संख्या : 1622

 • तांत्रिक चुका असलेली संख्या : 2801

विशेष मोहिमेत व ग्रामसभेत नागरिकांचा चांगला प्रतिसा मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक मयत मतदार आढळले आहेत. ती नावे वगळण्यात येतील. निवडणुकीच्या शासकीय पोर्टलवर नाव पाहता येईल किंवा व्होटर हेल्पलाइन ऍप प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून स्त:सह कुटुंबीयांची नावे तपासावीत.

- भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

हेही वाचा: ...अन्यथा 'सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकामाला दोन महिन्यांची मुदत!

ठळक बाबी...

 • जिल्ह्यात 41 हजार 789 मयत मतदार

 • विशेष मोहिमेत 22 हजार 519 नवमतदार वाढले

 • 49 तृतीयपंथी मतदारांनी केला अर्ज

 • जिल्ह्यात आता 35 लाख 5 हजार 635 मतदारांची संख्या

रांगोळीद्वारे जनजागृती

मतदार जनजागृती करण्यासाठी सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, बार्शी येथील भगवंत मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर या प्रसिद्ध मंदिरांमध्ये रांगोळीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.

loading image
go to top