पंढरपूरकरांसाठी आली मनसे धावून ! पक्षातर्फे उभारले राज्यातील पहिले कोव्हिड हॉस्पिटल

मनसेतर्फे उभारले पंढरपुरात राज्यातील पहिले कोव्हिड हॉस्पिटल
MNS
MNSCanva
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सेवा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत. अशा संकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) येथील नागरिकांच्या वैद्यकीय मदतीसाठी धावून आली आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राज्यातील पहिले कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospital) पंढरपुरात (Pandharpur) सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, या हॉस्पिटलमध्ये पत्रकारांवर देखील मोफत उपचार केले जाणार आहेत. (The first coveted hospital in the state was set up by MNS at Pandharpur)

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे आणि नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून 150 बेडचे पल्स कोव्हिड हॉस्पिटल सुरू केले आहे. आज (सोमवारी) सकाळी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदी व प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते या कोव्हिड हॉस्पिटलचे उद्‌घाटन झाले.

MNS
"झेडपीतील लकवा मारलेल्या हातांना "पाकीट'रूपी औषध मिळालं की फायलींवर तत्काळ सह्या होतात !'

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्येने सोलापूर जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे. येथे दररोज सरासारी 300 हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडू लागली आहे. परिणामी येथील शासकीय आणि खासगी वैद्यकीय सेवेवर कमालीचा ताण आला आहे. पंढरपुरात वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने रुग्णांना सोलापूर, सांगली, पुणे, मिरज आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशातच कोरोनाच्या वैद्यकीय खर्चामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. गरीब व गरजू रुग्णांवर माफक दरात आणि वेळेवर कोरोनाचे उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून कोव्हिड हॉस्पिटल सुरू केले आहे.

हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनचे 50 बेड तयार करण्यात आले आहेत. शिवाय येथील रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाश्‍ता, चहा आणि आवश्‍यक त्या सोयी- सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ना नफा ना तोटा या तत्त्वावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या वैद्यकीय सेवेमुळे परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MNS
हरणाच्या अवघ्या दोन दिवसांच्या पाडसाला मिळाले शेळीच्या दुधामुळे जीवदान !

पत्रकारांवर मोफत उपचार

कोरोना काळात कोरोना योद्धे म्हणून पत्रकार आपला जीव धोक्‍यात घालून काम करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक पत्रकार हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर अनेक पत्रकारांना कर्ज काढून उपचार घ्यावे लागले. पत्रकारांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेऊन येथील हॉस्पिटलमध्ये पत्रकारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. हॉस्पिलटमध्ये पत्रकारांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात आल्याचेही मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur Police Raid on MD Drugs
Mumbai-Mantralay
A total of 1,667 beneficiaries availed government schemes and services at the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Samadhan Camp in Mohol, where 17 departments offered citizen-centric services under one roof.
BJP workers staged a road blockade and burnt an effigy of Shiv Sena MP Sanjay Raut in Sangola, protesting his remarks against Minister Jaykumar Gore.
Marathi News Esakal
www.esakal.com