वंचित, बसप, रिपाइं, आप, मनसेचे दिसेना अस्तित्व | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित, बसप, रिपाइं, आप, मनसेचे दिसेना अस्तित्व!
वंचित, बसप, रिपाइं, आप, मनसेचे दिसेना अस्तित्व!

वंचित, बसप, रिपाइं, आप, मनसेचे दिसेना अस्तित्व!

सोलापूर : राज्यात शिवसेना (Shiv Sena), कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले. तर केंद्रात भाजपने (BJP) रिपाइंला सोबत घेतले. त्यामुळे आता केंद्रविरुद्ध राज्य, असा संघर्ष पाहायला मिळत आहे. बलाढ्य पक्षांच्या राजकारणात राज्यातील वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी (BSP), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या लहान पक्षांचे अस्तित्वच जिल्ह्यात कुठे दिसत नाही, असे बोलले जात आहे.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

सोलापूर शहरात आनंद चंदनशिवे यांच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीने महापालिकेत एंट्री केली. मात्र, त्यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाने त्यांची प्रदेश प्रवक्‍तेपदी निवड केली. मात्र, त्या ठिकाणी त्यांचे मन रमले नाही आणि चंदनशिवे यांनी आता राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळे बहुजन समाज पार्टीचा शहर- ग्रामीणमधील तगडा नेता कोण, असा प्रश्‍न मतदार विचारू लागले आहेत. दुसरीकडे, वंचित बहूजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा रेश्‍मा मुल्ला यांनी काही महिन्यांपूर्वी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतील पोकळी भरून निघालेली नाही.

आम आदमी पार्टीचे ग्रामीणमध्ये फारसे अस्तित्व दिसत नाही. शहरात काही मोजके पदाधिकारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आवाज उठविल्यावरच ते विविध प्रश्‍नांवर जागे होतात, अशी चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन आता स्लो झाल्याचे चित्र असून दिलीप धोत्रे वगळता अन्य कोणताही नेता पक्षबांधणीसाठी पुढे येताना दिसत नाही. मनसेची महिला संघटना खिळखिळी झाल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महापालिका व जिल्हा परिषदेत या पक्षांची ताकद काय असणार, याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: 2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस! जानेवारीपासून लसीकरण

राजाभाऊ म्हणतात, वेळ आल्यावर ओपन करून पत्ते

महापालिका निवडणूक जानेवारी-फेब्रुवारीत होण्याची शक्‍यता असून, प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. सोलापूर शहरात रिपाइंची सुद्धा ताकद आहे. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे रिपाइंचे जिल्ह्याचे नेते आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत रिपाइंची भूमिका सरवदे यांनी अजूनपर्यंत स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, विरोधकांना आताच हुशार करण्यापेक्षा निवडणुकीच्या अगोदर केंद्रीय मंत्री, पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाची भूमिका (पत्ते) स्पष्ट करू, असे सरवदे यांनी सांगितले. या निवडणुकीत रिपाइं नगरसेवकाच्या माध्यमातून महापालिकेत प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

loading image
go to top