esakal | विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीचे कान्होपात्राचे झाड नव्याने लावणार ! आषाढीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोपण
sakal

बोलून बातमी शोधा

Kanhopatra

विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीचे कान्होपात्राचे झाड नव्याने लावणार !

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात संत कान्होपात्राची संजीवन समाधी आहे. समाधी लगतच येथे शंभर वर्षांपूर्वीचे जुने तरटीचे झाड आहे.

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात (Sri Vitthal-Ruktramini Temple) संत कान्होपात्राची (Saint Kanhopatra) संजीवन समाधी आहे. समाधी लगतच येथे शंभर वर्षांपूर्वीचे जुने तरटीचे झाड आहे. विठ्ठल दर्शनापूर्वी दर्शन रांगेतील भाविक याच झाडाच्या फांदीला मिठी मारून कान्होपात्रेचे दर्शन झाल्याचे समाधान मानतात. दरम्यान, मंदिरातील हे शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचे जुने कान्होपात्रेचं (तरटीचे) झाड वटून गेले आहे. येथे फक्त झाडाच्या वाळलेल्या फांद्या उरल्या आहेत. तरीही भाविक कान्होपात्रेचं झाड म्हणून याच वाळलेल्या फांद्यावर माथा टेकवून कान्होपात्रेचं मनोभावे दर्शन घेतात. आता मंदिर समितीने (Vitthal-Rukmini Mandir Samiti) येथे नवीन तरटीचे झाड लावण्याचा निर्णय घेतला आहे. (The hundred year old Kanhopatra tree in the Vitthal temple will be planted anew)

हेही वाचा: 'शासनाकडून लसपुरवठा होत नाही, मग माझ्या खिशातून करू का?'

मंदिरातील तरटीचं झाड आणि संत कान्होपात्रा यांच्या विषयी भाविकांच्या मनात अपार श्रद्धा आहे. भाविकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने संत कान्होपात्रेच्या समाधीजवळ पुन्हा नव्याने तरटीचं झाड (कान्होपात्रा वृक्ष) लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंदिरातील संत कान्होपात्रा समाधी जवळील जुन्या पिंपळाच्या झाडाच्या जागी तरटी वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे. या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता कान्होपात्रेच्या बहरलेल्या नव्या वृक्षाचेही दर्शन मिळणार आहे.

हेही वाचा: होनमुर्गीत रोखले दोन बालविवाह ! चाईल्ड लाइनच्या कॉलवरून कारवाई

अशी आहे कान्होपात्राची आख्यायिका

मंगळवेढा (Mangalwedha ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथील गणिकेची मुलगी कान्होपात्रा ही विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. बिदरच्या बादशहापासून आपले रक्षण व्हावे म्हणून तिने थेट विठ्ठलाला साकडे घातले. विठ्ठलाने तिची ही कैफियत ऐकून तिला मंदिरातील बाजीराव पडसाळीत समाधी घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार संत कान्होपात्रेने येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात याच तरटी झाडाच्या रूपात कान्होपात्रेला पाहिले जाते. कालांतराने हे झाड वाळून गेले. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही, अशी वारकऱ्यांची धारणा आहे. भाविकांच्या श्रद्धेचा व त्यांच्याविषयी असलेल्या भावनांचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने येथे पुन्हा तरटीचे रोपण करण्याचा निर्णय घेतल्याचे विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

loading image