अनलॉकनंतर वाढली सोलापूरातील रूग्णसंख्या

अनलॉकनंतर वाढली सोलापूरातील रूग्णसंख्या
Updated on
Summary

मागील 12 दिवसांत पहिल्यांदाच मंगळवारी रूग्णसंख्या वाढल्याचे पहायला मिळाले.

सोलापूर : कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी झाल्याने सोलापूर शहरातील दुकाने अनलॉक (Unlock) झाली. मात्र, मागील 12 दिवसांत पहिल्यांदाच मंगळवारी रूग्णसंख्या वाढल्याचे पहायला मिळाले. शहरातील प्रभाग नऊमध्ये सर्वाधिक 13 रूग्ण आढळले. मंगळवारी शहरात 41 रूग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू (Died) झाला आहे. तर ग्रामीण भागात 12 हजार 193 संशयितांमध्ये 357 जण पॉझिटिव्ह आले असून 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. (the number of corona patients has increased on tuesday after the unlock in solapur)

अनलॉकनंतर वाढली सोलापूरातील रूग्णसंख्या
कोरोनाच्या मृत्यूपासून एक लाख सहा हजार व्यक्‍ती सुरक्षित

आतापर्यंत शहरातील तीन लाख 62 हजार 751 संशयितांमध्ये 28 हजार 348 जण पॉझिटिव्ह आले असून त्यातील एक हजार 383 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 26 हजार 745 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ग्रामीणमध्ये 11 लाख 97 हजार 637 संशयितांमध्ये एक लाख 27 हजार 150 जण पॉझिटिव्ह आले असून त्यातील दोन हजार 775 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील एक लाख 21 हजार 293 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगऴवारी अक्‍कलकोट, बार्शी, मंगळवेढा, सांगोला व दक्षिण सोलापुरात एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. तर करमाळा व उत्तर सोलापुरातील प्रत्येकी तिघांचा तर मोहोळ, पंढरपुरातील प्रत्येकी चौघांचा आणि माढ्यातील पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच माळशिरस तालुक्‍यातील एका रूग्णाचा कोरानाने बळी घेतला आहे.

अनलॉकनंतर वाढली सोलापूरातील रूग्णसंख्या
बालविवाह वाढूनही बाल कल्याण समित्या झोपलेल्याच

'म्युकरमायकोसिस'चे 33 बळी

कोरोनातून बरे झालेल्यांना आता म्युकरमायकोसिसच्या आजाराची चिंता लागली आहे. आतापर्यंत शहर-जिल्ह्यात 415 रूग्ण आढळले असून त्यातील 33 रूग्णांचा बळी गेला आहे. सध्या 200 रूग्णांवर 32 रूग्णालयातून उपचार सुरू आहेत. जिल्हाभरातील 182 रूग्ण बरे झाले आहेत. मंगऴवारी या आजाराने दोघांचा मृत्यू झाला आहे.

अनलॉकनंतर वाढली सोलापूरातील रूग्णसंख्या
पोलिस दलातील संघर्षयोध्दा कोरोनाचा बळी

नियमांचे पालन करावेच लागेल

15 एप्रिलपासून सुरू झालेले कडक निर्बंध सोमवारी (ता. 7) शिथिल करण्यात आले. आता बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली असून त्याठिकाणी ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोरोनासंबंधीचे नियम तंतोतंत पालन करायला हवेत. अन्यथा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला लवकरच निमंत्रण मिळेल, असा खबरदारीचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. मंगऴवारी शहरातील प्रभाग क्र. तीन, 24, 21 मध्ये प्रत्येकी तीन, प्रभाग क्र. पाच, 23 मध्ये प्रत्येकी चार, प्रभाग क्र. सहा, आठ, 14, 17 मध्ये प्रत्येकी दोन, प्रभाग क्र. नऊमध्ये सर्वाधिक 13 आणि 11, 12, 26 मध्ये प्रत्येकी एक रूग्ण सापडला आहे. (the number of corona patients has increased on tuesday after the unlock in solapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com