esakal | मोहोळची वाटचाल कोरोनामुक्तीकडे! लसीकरणाचा ओलांडला पन्नास हजारांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

मोहोळ कोरोनामुक्तीकडे!

लसीकरणातही तालुक्‍याने पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 23 हजार 860 नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. तर 28 हजार 875 नागरिकांचा एक डोस पूर्ण झाला आहे.

मोहोळ कोरोनामुक्तीकडे! लसीकरणाचा ओलांडला पन्नास हजारांचा टप्पा

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍याची (Mohol Taluka) कोरोनामुक्तीकडे (Covid-19) वाटचाल सुरू असून, तालुक्‍यात 175 जणांवर उपचार सुरू आहेत, तर पाच हजार 400 जण बरे होऊन घरी गेले आहेत. एक लाख 24 हजार नागरिकांच्या चाचण्या झाल्या असून, लसीकरणाच्या (Covid Vaccination) माध्यमातून तालुक्‍याने 50 हजारचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर यांनी दिली.

हेही वाचा: 'एकटे जाऊ नका मलाही सोबत घेऊन चला!' पतीनंतर पत्नीचेही निधन

मोहोळ तालुक्‍यातील आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोनाबाबत मोठी जनजागृती केली असून, तहसीलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह अन्य समिती सदस्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 92 हजार 755 नागरिकांची रॅपिड अँटिजेन तर 30 हजार 897 नागरिकांच्या इतर स्वरूपाच्या चाचण्या करण्यात आल्या. 5 हजार 565 जण पॉझिटिव्ह असून त्यापैकी 175 जण सध्या उपचार घेत आहेत, तर 5 हजार 390 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

लसीकरणातही तालुक्‍याने पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 23 हजार 860 नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. तर 28 हजार 875 नागरिकांचा एक डोस पूर्ण झाला आहे. एकूण 52 हजार 700 जणांचे लसीकरण झाले आहे. मोहोळ तालुक्‍याची लोकसंख्या सुमारे तीन लाख आहे. लसीकरणासाठी एक लाख 98 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 18 ते 45 वयोगटाच्या 23 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 53 अपंगांचे तर 29 कुपोषित बालकांच्या आई-वडिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी 111 शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. एकूण सरासरी पाहिली तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्‍याचे 45 टक्के काम झाले आहे.

हेही वाचा: पोलिसांच्या तत्परतेमुळे शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटला काळवीट !

बोगस डॉक्‍टर शोध मोहीम

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पात्रुडकर, गटविकास अधिकारी मोरे हे पोलिस पथकासह तालुक्‍यातील बोगस डॉक्‍टरांचा शोध घेत आहेत. तालुक्‍यात पाच बोगस डॉक्‍टर आहेत. बोगस डॉक्‍टरांच्या शोध मोहिमेमुळे ते ज्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतात त्या ठिकाणांचे फलक काढले आहेत. अनेक ठिकाणी गावकरीच त्यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.

loading image
go to top