जागतिक परिचारिका दिन : आयुष्यातील सर्वांत मोठी मृत्यूशी चाललेली लढाई "त्या' लढताहेत निर्धाराने ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nurses Day

जागतिक परिचारिका दिन : आयुष्यातील सर्वांत मोठी मृत्यूशी चाललेली लढाई "त्या' लढताहेत निर्धाराने !

सोलापूर : त्या लढताहेत कोरोनाशी अविरतपणे... कधी त्या रुग्णांची सेवा करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करतात... तर कधी त्या स्वतः कोरोनाच्या (Covid-19) आजारात सापडत आहेत... प्रत्येक परिचारिकेच्या (Nurses) आयुष्यातील सर्वांत मोठी मृत्यूशी चाललेली लढाई (Battle With Death) त्या निर्धाराने लढत (Fight with Corona) आहेत. (The nurses are fighting the biggest battle with corona in life)

हेही वाचा: International Nurses Day 2021 : कौतुकाऐवजी आधी प्रश्‍न सोडवा !

प्रत्येक रुग्णालयात सातत्याने कोरोना रुग्णांची गर्दी वाढत आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर सुरवातीला उपचार यंत्रणा सक्षम नव्हती. तरीही परिचारिका डॉक्‍टरांच्या मदतीने लढत होत्या. डॉक्‍टर व परिचारिका यांनी ही लढाई लढताना अविरत असा लढा दिला. पण आता दुसरी लाट तेवढ्यात वेगाने पुन्हा एकदा आली आहे. सातत्याने ही लढाई लढताना कोराना विषाणूचे एक्‍स्पोजर होत असल्याने त्यांना स्वतःला देखील कोरोनापासून वाचवायचे आहे. एक आई, बहीण व पत्नी या नात्याने या परिचारिका कोरोनाशी लढत असताना दुसरीकडे स्वतःच्या कुटुंबाला देखील स्वतःच्या माध्यमातून संसर्ग होऊ नये असा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा: शहर-जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरूच ! मंगळवारी 60 बळी; 2703 जणांना डिस्चार्ज

या कालावधीत अनेक परिचारिका या पद्धतीने दुहेरी लढाई लढत होते. एकीकडे अविरत परिश्रमातून रुग्णांची सुश्रुषा करत असताना दुसरीकडे स्वतःचे कुटुंब वाचवणे असे या लढाईचे स्वरूप होते. प्रत्येक दाखल झालेला रुग्ण कोरोनातून बरा व्हावा एवढेच प्रार्थनेचे शब्द त्यांच्याजवळ कायम होते. तरीही मृत्यूशी लढाई एखाद्या युद्धाप्रमाणे असली तरी त्यातून केवळ प्रत्येकासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हा एक उपाय प्रत्येकाने केला तर कदाचित हे कोरोनाचे दुष्टचक्र थांबेल, असे या परिचारिकांना वाटते.

या आहेत अनुभव परिचारिकांचे

  • पीपीई किटमध्ये अनेक तास सातत्याने काम

  • सर्वाधिक मृत्यूच्या घटनांचा काळ

  • स्वतःला कोरोना संसर्गापासून वाचवण्याचे नियम पाळणे आवश्‍यक

  • स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी अनेक महिने स्वतःचे विलगीकरण

  • अनेक परिचारिका रुग्णालयात बाधित होऊन पुन्हा बऱ्या झाल्याच्या घटना

मी स्वतः कोरोनाच्या लढाईत रुग्णांचे मृत्यू अनुभवले असले तरी प्रत्यक्षात प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे नियम व आता लसीकरणाचा नियम पाळला तर कदाचित नागरिकांना स्वतःचे संरक्षण करता येणार आहे.

- संध्या मंगरुळकर, इन्चार्ज परिसेविका, अपघात विभाग, सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

रुग्णसेवा ही सर्वोत्कृष्ट मानवी सेवा आहे. त्याचा अनुभवच नव्हे तर संस्कारच आमच्या घरात दुसऱ्या पिढीत उतरला आहे. माझा मुलगा देखील सर्वोपचार रुग्णालयात कोरोना लढाईत रुग्णसेवच्या कार्याला लागला आहे.

- मीनाक्षी कर्णेकर, सेवानिवृत्त परिचारिका, सदिच्छानगर, सोलापूर

Web Title: The Nurses Are Fighting The Biggest Battle With Corona In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :update
go to top