
शहर-जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरूच ! मंगळवारी 60 बळी; 2703 जणांना डिस्चार्ज
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना (Covid-19) मृत्यूचे थैमान सुरूच आहे. ग्रामीण भागातील 49 आणि महापालिका हद्दीतील 11 अशा एकूण 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मंगळवारच्या अहवालातून (Corona Report) स्पष्ट झाले. तर 2 हजार 703 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यातील 2 हजार 478 जण ग्रामीण भागातील तर 225 जण हे महापालिका हद्दीतील आहेत. (Corona deaths continue in Solapur city and district)
हेही वाचा: महापालिका प्रशासन भारावले ! कारण, "त्या' शिक्षकाने मागितली पुन्हा कोरोना ड्यूटी
मंगळवारी 1 हजार 687 नव्या कोरोना बाधितांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. त्यातील 1 हजार 547 रुग्ण ग्रामीण भागातील तर 140 रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत. रुग्णालयात सध्या 16 हजार 986 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 15 हजार 610 रुग्ण ग्रामीण भागातील तर 1 हजार 376 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत.
हेही वाचा: राज्यातील धरणांत केवळ 10 टक्के पाणीसाठा ! पुणे विभागात गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के पाणी कमी
माढ्यात दहा जण दगावले
ग्रामीण भागात आज कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये माढा तालुक्यात सर्वाधिक 10, दक्षिण सोलापूर तालुक्यात 8, उत्तर सोलापूर तालुक्यात 7, मोहोळ व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी 6, अक्कलकोट तालुक्यात 5, माळशिरस तालुक्यात 4, बार्शी तालुक्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
माळशिरसमध्ये 361 नवे बाधित
आज ग्रामीण भागात 1 हजार 547 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 361 रुग्ण हे माळशिरस तालुक्यातील आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 44, बार्शी तालुक्यातील 184, करमाळा तालुक्यातील 224, माढा तालुक्यातील 192, मंगळवेढा तालुक्यातील 130, मोहोळ तालुक्यातील 98, उत्तर सोलापूर तालुक्यातील 34, पंढरपूर तालुक्यातील 212, सांगोला तालुक्यातील 12 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 56 नव्या रुग्णांचा समावेश आहे.
Web Title: Corona Deaths Continue In Solapur City And
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..