esakal | सोलापुरात प्रवेश करताय, सावधान! जुना पूना नाका ते एसटी स्टॅंड रस्ता धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापुरात प्रवेश करताय, सावधान! जुना पूना नाका ते एसटी स्टॅंड रस्ता धोकादायक

हा रस्ता सोलापूर शहरात प्रवेश करताना पहिल्यांदाच लागतो. खराब झालेल्या या रस्त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना, हे सोलापूर स्मार्ट सिटीच आहे का, असा प्रश्‍न पडतो.

सोलापुरात प्रवेश करताय, सावधान! एसटी स्टॅंड रस्ता धोकादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील एसटी स्टॅंड (ST Stand) ते जुना पूना नाक्‍याजवळील संभाजी महाराज चौकापर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. हा रस्ता सोलापूर शहरात (Solapur City) प्रवेश करताना पहिल्यांदाच लागतो. खराब झालेल्या या रस्त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना, हे सोलापूर स्मार्ट सिटीच (Solapur Smart City) आहे का, असा प्रश्‍न पडतो. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये सहभाग होऊन मोठा काळ ओलांडला आहे, तरीही शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. परंतु, रस्त्यांची स्थिती दयनीयच आहे. एसटी स्टॅंड ते जुना पूना नाका हा रस्ता म्हणजे सोलापूर शहराचे प्रवेशद्वार आहे. मात्र, हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यावर खड्डे आहेत, असा प्रश्न येथून ये-जा करणाऱ्यांना पडतो.

हेही वाचा: विधी अभिप्रायानंतरच 'सिद्धेश्‍वर'च्या 'चिमणी'ची पुढील कारवाई!

एसटी स्टॅंड ते संभाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर फळविक्रेते बेशिस्तपणे थांबलेले असतात. फूटपाथची अवस्था दयनीय झाली आहे. काही काही ठिकाणी तर फूटपाथच नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे. दोनचाकी, चारचाकी वाहने तर या मार्गावर कसेही लावण्यात आली आहेत. तसेच हे कमी म्हणून की काय, मोकाट जनावरे भर रस्त्यावर आरामात ठिय्या मारून बसलेले दिसतात.

हेही वाचा: गणेशमूर्ती आमची, किंमत तुमची! आधार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली. रस्त्यांची सध्याची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. मला आता या खड्ड्यांमुळे अर्धा किलोमीटर फिरून यावे लागले. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्यामुळे मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत

- प्रसाद अतनूरकर, नागरिक, सोलापूर

या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रिक्षा चालविण्यास खूप त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे रिक्षाला पेट्रोलही जास्त लागत आहे. रिक्षा खराब होत आहे, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित करावा, हीच अपेक्षा आहे.

- संजय खटके, रिक्षाचालक

हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे. रस्त्यामुळे वाहन चालवणे कसरतीचे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी खूप खड्डे पडले आहेत आणि पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे कळत नसल्याने गाडी चालविणे अवघड होत आहे.

- बबन चव्हाण, नागरिक

हा रस्ता सोलापुरात प्रवेश करताना पहिल्यांदाच लागतो. खराब झालेल्या या रस्त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना हे सोलापूर स्मार्ट सिटीच आहे का, असा प्रश्‍न पडतो. वर्ष झाले तरी या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा.

- मुकेश बुजरुके, चहा विक्रेता

loading image
go to top