esakal | विद्यापीठाच्या परीक्षा 6 मेपासून ऑनलाइन ! तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाइन

बोलून बातमी शोधा

Solapur University

विद्यापीठाच्या परीक्षा 6 मेपासून ऑनलाइन ! तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाइन

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur University) परीक्षा 6 ते 23 मे या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने (Online Exam) होत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर दिले आहेत. pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. (The online exams of Solapur University will be held online from May six)

कोरोना आणि टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 6 मेपासून बीए, बीकॉम, बीएस्सी भाग एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तीन मिनिटांची एक व्हिडिओ क्‍लिप तयार करण्यात आली आहे. ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याचबरोबर हेल्पलाइन क्रमांकदेखील जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून केली जाणार आहे.

हेही वाचा: सहाय्यक कमांडंट भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस ! त्वरा करा

विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली. विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी व पासवर्ड कॉलेजच्या मेलवर पाठवलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पासवर्ड मिळाला नसेल तर त्यांनी फॉर्गेट पासवर्डवर क्‍लिक करून आपल्या मोबाईलवर पासवर्ड मिळवावा, अशी व्यवस्था पोर्टलवर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळेनुसार पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे. इतर वेळी त्यांनी पोर्टलवर जाऊन लॉग इन करू नये, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाइन क्रमांक

अमित : 8010093831, शुभम : 8010076657, अफजल : 8010083760, विनायक : 8010085759.

हेही वाचा: पंढरपूर निवडणुकीची बातमी अन्‌ माने यांच्याशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही

परीक्षेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांक

मोटे : 8421905623, लटके : 8421238466, आवटे : 8421638556, गंगदे : 8421068436, गावडे : 8421528436, बाबरे : 8421478451