सांगोल्याच्या 'डाळिंब कोठारा'लाच लागली कीड!

'सांगोल्याचे डाळिंब' असलेली ओळख पुसून जाण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
pomegranate
pomegranateesakal
Updated on
Summary

'सांगोल्याचे डाळिंब' असलेली ओळख पुसून जाण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

सांगोला (सोलापूर) : सांगोल्याच्या डाळिंब (Pomegranate) कोठारालाच कीड लागली आहे. मर व पिन होल बोररमुळे (खोडकिडा) बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्याने दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे क्षेत्र घटत आहे. तालुक्यातील यापुढे अशाच डाळिंब बागा (Pomegranate orchards) नष्ट होऊ लागल्या तर 'सांगोल्याचे डाळिंब' असलेली ओळख पुसून जाण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

pomegranate
सांगोला : लग्नासाठी दिले दीड लाखांचे कमिशन, लग्नानंतर नववधू अडीच लाख घेऊन फरार

सांगोला तालुका म्हणजे 'दुष्काळ' ही ओळख पुसण्याचे प्रमुख कारण म्हणजे तालुक्यातील असणारे डाळिंबाचे उत्पन्न होय. कमी पाण्यावर ज्या माळरानावर फक्त कुसळ उगवत होते तिथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लाखो रुपयांचे डाळींबाचे उत्पन्न घेतले. डाळिंबाच्या वाढत्या क्षेत्रामुळे तसेच एकूण उत्पन्नामुळे तालुक्याची ओळखच गेल्या काही वर्षात बदलली आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन होत असल्याने देशातील कानाकोपर्‍यातून डाळिंबाचे व्यापारी येऊन शेतकऱ्यांच्या बांधावरच डाळिंब खरेदी करू लागले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबीच्या आर्थिक व्यवहारामुळे तालुक्यातील एकूण आर्थिक व्यवहार पूर्णपणे बदलून गेले. डाळिंबाच्या मोठ्या उत्पन्नामुळे तालुक्यात इतर अनेक उद्योग, व्यवसाय वाढीस लागले. सध्या किड, मर व पिन होल बोबरसारख्या रोगाने डाळिंब बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी होवू लागले आहे. याचा परिणाम तालुक्यातील एकूण अर्थकारणावर दिसून येणार आहे.

pomegranate
सांगोला : रतनकाकी प्रथमच राजकीय व्यासपीठावर

मर व पिन होल बोररमुळे बागा होवू लागल्या नष्ट

शेतकऱ्यांच्या जीवनमान बदलून गेलेल्या डाळिंब पिकाला सध्या मोठ्या प्रमाणात कीड लागली आहे. झाडे पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर जळून जाऊ लागली आहे. यामुळे सुरुवातीला बागेतील पिक एक दोन पिवळी पडून जळू लागलेले झाडे काही महिन्यातच संपूर्णपणे बागाच्या बागा सध्या जळून लागल्याचे चित्र सांगोला तालुक्यात दिसू लागले आहे. मर व पिन होल बोररमुळे तालुक्यातील अनेक बागा जळून जाऊ लागल्याने तालुक्यातील डाळिंब क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. या रोगामुळे झाडे जळून गेले आहेत, तेथे नवीन लागवड केली असता रोपेही काही महिन्यात जळून जातात. त्यामुळे त्या क्षेत्रात लवकर नवीन बागही लावता येत नाही.

उपाययोजना करुन उत्पादक मेटाकुटीला

आपली डाळिंबाची झाडे जळून जाऊ नये, म्हणून डाळिंब उत्पादक शेतकरी या क्षेत्रातील जाणकार, दुकानदार यांच्याकडून सांगितलेले नानाविध उपाययोजना करू लागला आहे. झाडावर व झाडांच्या खोडावरती अनेक औषधांची फवारणी करीत आहेत. तसेच झाडाच्या मुळावाटेही औषधे ड्रीपद्वारे सोडली जात आहेत. मर व पिन होल बोररने झाडे जळून जाण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे.

pomegranate
सांगोला शहरातील पात्र दिव्यांगांना चार लाखांचे विमा कवच !

बहार धरलेली डाळिंबाची माझी बाग सध्या मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची झाडे जळून चालली आहेत. बहार धरलेली बाग आता झाडे जळून जावू लागल्याने सोडून द्यावे लागले आहे. यामुळे आता माझी सर्व डाळिंबीची झाडेच काढावी लागणार आहेत. माझा केलेला खर्च देखील निघत नाही.

- नवनाथ पवार, डाळिंब उत्पादक शेतकरी.

डाळिंबाचे दोन पिकेच घेतली होती. परंतु झाडावर मोठ्या प्रमाणात पिन होल बोररमुळे यावर्षी बहार धरलेला असताना झाडे जुळू लागल्याने सेटिंग झालेली संपूर्ण बागच काढून टाकावी लागली आहे.

- संतोष खंडागळे, डाळिंब उत्पादक शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Religious Tourism Marred by Fraud: Tuljapur Pilgrims Face Exploitation
Delay in Monsoon Arrival Worries Farmers; Solapur Awaits Rainfall
Ladaki Bahin Yojana
 अभियांत्रिकी क्षेत्रात संधी
Marathi News Esakal
www.esakal.com