esakal | राज्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही; या मंत्र्याने केले साथ देण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही; या मंत्र्याने केले साथ देण्याचे आवाहन

राज्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही; या मंत्र्याने केले साथ देण्याचे आवाहन

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : बालविवाह (Child marriage) हा कायद्याने गुन्हा आहे. कोवळ्या मुला-मुलींचे आयुष्य यामुळे बरबाद होते. लग्नाची घाई जीवघेणीही ठरू शकते. बेकायदेशीर कृत्याला बळी न पडता मुलींना चांगले शिक्षण देण्याची गरज आहे. महिला व बालकल्याण विभागाने आजवर ५६०च्या वर बालविवाह रोखले आहेत. कोविड काळात बालविवाहाच्या घटना वाढणे हे चिंताजनक आहे. परंतु, राज्यात एक ही बालविवाह होऊ देणार नाही हा माझा प्रण आहे. या कामात सर्वांची साथ हवी आहे, अशी ट्विट महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Welfare Minister Yashomati Thakur) यांनी केले. (yashomati thakur said, No child marriage will be allowed in the state)

बालकांच्या सुरक्षिततेबाबत तसेच शॉर्ट टर्म-लॉंग टर्मला शासनाकडून जास्तीत जास्त कशी मदत करता येईल आदी विषयांच्या अनुषंगाने झूम मिटिंग पार पडली. खासदार सुप्रिया सुळे तसेच अन्य मान्यवर या मिटिंगला उपस्थित होते. यावेळी यशोमती ठाकूर यांनी हा प्रण घेतला.

जग २१ व्या शकता गेले असतानाही बालविवाह काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. जवळपास मागील दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातला असतानाही बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. कोरोना काळात लग्नावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना इच्छेविरुद्ध कमी लेकांमध्ये लग्न समारंभ आटोपावे लागत आहे. दुसरीकडे बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

बालविवाहाविरुद्ध महिला व बालकल्याण विभाग अभा आहे. या विभागाने आजवर ५६० च्या वर बालविवाह रोखले आहेत. यामुळे अनेक मुला-मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचले आहेत. मुलींना चांगले शिक्षण देऊनच विवाह करण्याची गरज आहे. मात्र, असे न करता कोविड काळात बालविवाहाच्या घटना वाढणे हा चिंतेचा विषय असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

हवी सर्वांची साथ

बालविवाह रोखण्याचा प्रण यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे. यासाठी त्या कार्यही करणार आहे. मात्र, हे एकट्याचे काम नाही. यासाठी त्यांना सर्वांची साथ हवी आहे. सर्वांची साथ मिळाल्यास हे काम सोपी होईल.

(yashomati thakur said, No child marriage will be allowed in the state)