Solpaur News : ओला कॅबला ऑटोचालकांचा प्रतिसाद घटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ola Cabs
सोलापूर : ओला कॅबला ऑटोचालकांचा प्रतिसाद घटला

सोलापूर : ओला कॅबला ऑटोचालकांचा प्रतिसाद घटला

सोलापूर : शहरात ॲाटोचालकांच्या साठी ओलाकॅब (ola cab service)ही ऑनलाईन सेवा सुरु झाली. पण योग्य पध्दतीने ही सेवा समजुन न घेतल्याने अनेक ॲाटोचालकांचा या सेवेसाठीचा प्रतिसाद घटला आहे. त्यामुळे ओलावर ॲक्‍टीव ऑटोचालकांना जादा भाडे मिळून त्यांचे उत्पन्न वाढले आहे. पुणे व मुंबईप्रमाणे ओला ही ऑनलाईन टॅक्‍सीसेवा सोलापुरात देखील कार्यरत आहे. मागील काही महिन्याच्या काळात ही सेवा तीनशे ते चारशे ॲाटोचालकांनी चालवण्यास घेतली. ऑनलाइन पध्दतीने ओला सेवा देणारे वाहन जवळपास कुठे आहे हे ॲटोत बसणाऱ्या ग्राहकाला कळते. तसेच ही सेवा सहज मागवून घेता येते. या सेवेचा ॲाटोचालकांना देखील फायदा होतो. आधीच प्रवाशांची बुकिंग होत असल्याने चालकांना लगेच भाडे मिळते. ओलाची सेवा हा एक चांगला पर्याय प्रवासी व ॲाटोचालकांना(passenger and aut driver) मिळाला होता.

हेही वाचा: सोलापूर : तीन वित्तीय संस्था स्थापून नागरिकांची 5.63 कोटींची फसवणूक

पण नंतर ॲाटोचालकांकडून या सेवेकडे दुर्लक्ष झाले. काहींनी त्यांचा ॲाटो ओलाच्या स्क्रीनवर दिसूच नये या प्रमाणे संपर्क बंद केला. ओला कॅबवर योग्य भाडे द्यावे लागते म्हणून अनोळखी प्रवाशांकडून जादा भाडे घेण्याची वृत्ती अनेकांना नडली. आता अर्ध्यापेक्षा अधिक ॲाटोचालकांनी ओलाच्या सेवेला प्रतिसादच दिला नाही. मात्र जे काही ॲाटोचालक ओलाची सेवा देत आहेत त्यांना भरपूर भाडे मिळू लागले आहे. काही ॲाटोचालक तर इतर आॅटोचालक उपलब्ध नसल्याने सकाळपासून ओलाची सेवा देऊ लागले आहेत.

हेही वाचा: कर्जपुरवठ्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्था सुरू होणे गरजेचे

पर्यटक व प्रवाशांना ओलाचे महत्व

बाहेरगावावरून येणारे पर्यटक व प्रवाशांना ओलाचे(ola cab) मोठे महत्व वाटते. कारण त्यात भाडे निश्‍चित असल्याने अडवून जादा भाडे मागणाऱ्यांकडूून सुटका होते. तसेच महिलांसाठी ओला सेवेचा प्रवास अत्यंत सुरक्षीत आहे.(safe travels for ladies ) कारण त्यामध्ये ऑनलाईन नोंदी असल्याने अडचण नाही.

पुणे व मुंबईप्रमाणे सेवा आवश्‍यकच

स्थानिक अाॅटोचालकांनी काहीही लक्षात न घेता ओला कॅबसारख्या सेवाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बाहेरगावावरून विशेषत - पुणे व मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सोलापुरात या सारख्या चांगल्या सेवा का नाहीत असा प्रश्‍न विचारला जात आहे.

हेही वाचा: रत्नागिरीकरांची तब्बल २८ कोटींची फसवणूक ; तीन संशयितांना अटक

मी ओलाची(olam cab service) सेवा प्रवाशांना देतो. मला कधीही प्रवाशांची प्रतिक्षा करावी लागत नाही. तसेच ऑनलाईन व्यवहार(online transaction) करत असल्याने ग्राहकांना देखील ते सोयीचे पडते. जो ओलाच्या ऑनलाईन सेवा देणार तो भाडे देखील ऑनलाईन देणार हे स्वाभाविकच आहे. तसेच ओला सेवेत भाडे देखील योग्य प्रमाणात मिळते.

- रमेश राठोड, आॅटोचालक, विजापूर रोड, सोलापूर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top