Solapur : बोरामणी येथे विमानतळासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची

होटगीरोड विमानतळ की बोरामणी विमानतळ अशा पेचात सोलापू्रची विमानसेवा अनेक वर्षे अडकली होती.
solapur airport
solapur airport sakal
Updated on

सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न म्हणून विमानसेवेकडे पाहिले जात आहे. विमानसेवा नसल्याने सोलापूर विकासाला मर्यादा येऊ लागल्या आहेत. होटगीरोड विमानतळ की बोरामणी विमानतळ अशा पेचात सोलापू्रची विमानसेवा अनेक वर्षे अडकली होती. होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विमानतळावरून तातडीने विमानसेवा सुरू करावी व बोरामणी येथे कायमस्वरूपी विमानतळ व्हावे यासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

solapur airport
Solapur News : अमृतमहोत्सवी कार्यक्रमात काळुंगेचे राजकीय पुनर्वसन होणार का ?

होटगी रोड विमानतळावरील धावपट्टी, संरक्षक भिंत व प्रशासकीय इमारतीची कामे सुरू आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील. सोलापुरातून मुंबईसाठी सोयीच्या वेळेवर विमानसेवा सुरू होणे आवश्‍यक आहे. विमानतळाची कामे पूर्ण झाल्यानंतर विमानतळाला वाहतूक परवाना मिळविण्यासाठी विमानतळाचे परीक्षण, सोयीच्या वेळेवर व सोयीच्या ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ५७५ हेक्टर जमिनीचे संपादन झालेले आहे. या विमानतळासाठी ३३ हेक्टरचे निर्वनीकरण आवश्‍यक आहे. केंद्रीय पर्यावरण समितीने २०२२ मध्ये निर्वनीकरण प्रस्ताव फेटाळला आहे. त्यानंतर अद्यापही नव्याने प्रस्ताव सादर केलेला नाही. बोरामणी विमानतळाचे निर्वनीकरण होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

होटगीरोड येथील विमानतळावरील धावपट्टीची लांबी २ हजार १०० मीटरचे आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्‍यक असलेली धावपट्टी या विमानतळावर उपलब्ध आहे. सोलापूरची शेती उत्पादने पाहता या शहराला प्रवासी विमानसेवेसह कार्गो विमानसेवेचीही नितांत गरज आहे. या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करता येऊ शकते. सध्या विमानसेवा नसल्याने उद्योग बाहेर जात आहे. सोलापुरात कमी खर्चात मनुष्यबळ उपलब्ध असणे ही सोलापूरची जमेची बाजू आहे. या ठिकाणी उद्योगाला मोठी संधी आहे.

- मिलिंद भोसले,

राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अभियंता संघटना

solapur airport
Solapur News : राज्यात महायुतीचे येणार ४८ खासदार - तानाजी सावंत

महत्त्वाचे...

  • आगामी निवडणुकीत विमानसेवा महत्त्वाचा मुद्दा

  • विमानसेवा नसल्याने नव्याने येईनात उद्योग

  • रात्रीच्या विमानसेवेसाठी बोरामणी विमानतळ आवश्‍यक

  • तरुणाईला हवी विमानसेवा अन्‌ आयटी इंडस्ट्री

  • उच्च शिक्षित तरुणाईचे स्थलांतर थांबविण्यासाठी विमानसेवेची मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com