जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!

जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!
जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!
जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!Sakal
Updated on
Summary

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

सोलापूर : दिवाळी (Diwali) तसेच भाऊबीज यासाठी अनेक विद्यार्थी, चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. त्यामुळे या दिवसात पुणे (Pune), मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad) येथून येणाऱ्या व परत जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. दिवाळी सणादरम्यान कोणत्याही प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (Solapur Sub-Regional Transport Department) विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची पाहणी करून प्रवाशांकडून ज्यादा तिकीटदर आकारले जाते किंवा नाही हे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाकडून तपासण्यात येणार असल्याची माहिती आरटीओच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!
मोठ्या आवाजाचे फटाके उडवणाऱ्यांना जागेवरच एक हजारांचा दंड!

ही मोहीम राबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन पथके करण्यात आली आहेत. दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरून सोलापूरमध्ये येणाऱ्यांच्या संभाव्य आर्थिक पिळवणुकीला यामुळे आळा बसणार आहे.

दिवाळी, भाऊबीज व नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक या प्रकाराला आळा बसावा यासाठी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. दोन पथकांकडून खासगी वाहनांची कोणत्याही वेळी कधीही तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!
पीएचडीच्या मुलाखती 16 नोव्हेंबरपासून! दोन उमेदवार असणार वेटिंगवर

दिवाळीसाठी अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी परत येतात. याचाच फायदा घेत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्‍यता असते. याला पायबंद घालण्यासाठी यंदाही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- अर्चना गायकवाड, प्रभारी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com