Solapur News : रिक्षा चालकाचा मुलगा झाला सनदी लेखापाल

सोलापुरातील अनिकेत दांडगेचे घवघवीत यश
solapur
solapursakal

सोलापूर : दि. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सोलापुरातील रिक्षा चालक सतीश दांडगे यांचे चिरंजीव अनिकेत दांडगे यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. आई-वडिलांचे स्वप्न त्याने जिद्दीने पूर्ण केले. अनिकेत सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अनिकेतचे वडील सतीश दांडगे हे सोलापूर शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर अनिकेतची आई अंजली गृहिणी आहे. आपल्या मुलाला चांगले शिकवून उच्चपदस्थ बनवण्याचा ध्यास दांडगे यांनी सुरवातीपासून घेतला होता. अनिकेतची घरची परिस्थिती अत्यंत बेताची. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याला शिक्षणाची मोठी आवड होती. अनिकेतचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हरीबाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स येथून पूर्ण केले.

विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर नक्की गाठू शकता. सीएपर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण होता. परंतु, सीए होण्यासाठी घेतलेली मेहनत, कष्ट आणि विशेष म्हणजे आई-वडिलांनी जी मला साथ दिली, त्यांच्या याच कष्टातून मी आज सीए झालो आहे. वडिलांनी रिक्षा चालवून कुटुंबाचा सांभाळ केला. मला शिक्षणात मदत केली. यापुढे मी माझ्या आई-वडिलांची सेवा करणार आहे.

— अनिकेत दांडगे, सीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com