जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणीचे पावणेचार लाख हेक्‍टरचे उद्दिष्ट !

सोलापूर जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणीसाठी पावणेचार लाख हेक्‍टरचे उद्दिष्ट
kharif sowing
kharif sowingEsakal
Summary

जिल्ह्याने दोन लाख 91 हजार 900 टन रासायनिक खतांची मागणी शासनाकडे केली आहे. त्यापैकी दोन लाख 14 हजार 360 टन खते मंजूर झाली आहेत.

माळीनगर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याच्या कृषी विभागाने आगामी खरीप हंगामाची (Kharif season) जोरदार तयारी केली आहे. तीन लाख 75 हजार 802 हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बी-बियाणे (Seeds), रासायनिक खतांचे (Chemical fertilizers) नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. (The target for kharif sowing in Solapur district is four lakh hectares)

kharif sowing
सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची खरिपाच्या तयारीची शेतात लगबग सुरू आहे. पाऊस पडण्यापूर्वी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्याच्या प्रयत्नात शेतकरी असल्याचे दिसते. खरिपात जिल्ह्यात प्रामुख्याने बाजरी, तूर, मूग, उडीद, मका, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके घेतली जातात. खरीप पेरणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 34 हजार 805 क्विंटल बियाणांची एकूण गरज भासेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. महाबीजमार्फत 13 हजार 206 क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने नोंदवली आहे.

kharif sowing
जिल्ह्यातील कोरोनाबाधित बालकांनी ओलांडला दहा हजारांचा टप्पा !

जिल्ह्यात कीटकनाशकांची दोन हजार 677, बियाणांची दोन हजार 829 तर खतांची दोन हजार 979 परवानाधारक विक्री केंद्रे आहेत. जिल्ह्याने दोन लाख 91 हजार 900 टन रासायनिक खतांची मागणी शासनाकडे केली आहे. त्यापैकी दोन लाख 14 हजार 360 टन खते मंजूर झाली आहेत. जिल्ह्यात एक लाख 11 हजार 190 टन खतांची उपलब्धता होती. त्यापैकी सहा हजार 512 टन खतांची विक्री झाली असून 1 एप्रिल 2021 पर्यंत एक लाख चार हजार 678 टन खते शिल्लक होती. मागील वर्षी जिल्ह्यात युरिया खताचा मोठा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे यंदा आठ हजार 800 टन युरियाचा साठा संरक्षित करण्यात आला आहे.

खरीप पेरणीचे जिल्ह्यातील प्रस्तावित पीक क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

  • बाजरी : 70 हजार

  • तूर : 95 हजार

  • उडीद : 70 हजार

  • मका : 55 हजार

  • सोयाबीन : 65 हजार

रासायनिक खतांची मागणी, (मंजूर आवंटन) (मेट्रिक टनमध्ये)

  • युरिया : 125000 (93250)

  • एमओपी : 32000 (19750)

  • एसएसपी : 22000 (23550)

  • डीएपी : 50000 (32450)

  • संयुक्त खते : 62900 (45360)

बांधावर खत वाटप ही योजना नाही. गावातील शेतकऱ्यांनी खताची एकत्रित मागणी करून कृषी सेवा केंद्राला रक्कम जमा करण्याची खात्री दिली तर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कृषी विभाग संबंधित केंद्रामार्फत बांधावर खते पोच करणार आहे. खतांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार आल्यास निरीक्षकामार्फत चौकशी करून दोषी असल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. त्याचे स्वरूप पाहून एफआयआर देखील दाखल होईल.

- रवी माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com