"जीवाला तर धोका आहे, पण कर्तव्यही महत्त्वाचे आहे !' टपाल कर्मचाऱ्यांची अविरत सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Postman

कोरोना आज आहे, उद्या नाही असे म्हणत प्रामाणिकपणे पोस्टमन कोरोना महामारीच्या संकट काळात देखील आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.

"जीवाला तर धोका आहे, पण कर्तव्यही महत्त्वाचे आहे !'

सोलापूर : कोरोना (Covid-19) महामारीच्या संकटकाळात नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सेवा देणे ही गोष्ट खरोखरच खूप कठीण होती. लोक काय म्हणतील, आपल्याला दारात उभे करतील की नाही, ही भीती सतत त्यांच्या मनात राहात होती. पण कोरोना आज आहे, उद्या नाही असे म्हणत प्रामाणिकपणे पोस्टमन (Postman) कोरोना महामारीच्या संकट काळात देखील आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. (The uninterrupted service of the postal staff continues despite the threat of corona)

हेही वाचा: बेड न मिळाल्याने कोरोना ड्यूटीवरील शिक्षकाच्या आईचा मृत्यू !

शहर- जिल्ह्यात एकूण पोस्टमन कर्मचारी 700 आहेत. तर आतापर्यंत 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लॉकडाउनमध्ये आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून मोलाचे योगदान देत आहेत. या सर्वांसोबत असाच आणखी एक कोरोना योद्धा आहे त्याच्याकडे कुणाचेही लक्ष वेधले जात नाही ते म्हणजे पोस्टमन. मागील दीड वर्षापासून जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत सोलापूर शहर तसेच जिल्ह्यात टपाल कर्मचारी एकही पत्र किंवा इतर टपाल गहाळ न करता नागरिकांच्या दारात जात आहेत.

हेही वाचा: पावसाळ्यातील विजांच्या दुर्घटना टाळा ! "ही' घ्या दक्षता

नागरिकांचे महत्त्वाचे टपाल, रजिस्टर, स्पीड पोस्ट, पार्सल वितरण, ज्येष्ठांची पेन्शन घरपोच देणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे नागरिकांना घरपोच देणे तसेच जीवनावश्‍यक औषधे देखील घरपोच देण्याचे काम हे पोस्टमन करीत आहेत. टपाल खात्यातील अनेक कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा देण्याचे काम करीत आहेत. मात्र त्यांना कोरोना योद्धा म्हणून अजूनही कोणीच पाहिले नसल्याची खंत आहे.

वातावरण भीतिदायक तरी कर्तव्यही महत्त्वाचे

मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या संकट काळात प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोना काळ आला आणि मनात धाकधूक निर्माण झाली. सुरवातीचे आणि आताचे दिवस भीतिदायक आहेत. पण कर्तव्य तर करावेच लागणार होते. कुटुंबातील सदस्यांनाही नेहमी काळजी वाटायची; पण आता आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचे आपण काही तरी देणे लागतो, म्हणून टपाल कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

कोरोनाच्या संकट काळात देखील पोस्टमन घरोघरी जाऊन नागरिकांचे पार्सल देत आहेत. मात्र अद्याप देखील पोस्टमन यांना कोरोना योद्धा म्हणून गणले जात नाही. त्याचबरोबर अनेकदा जिल्हाधिकारी यांना लसीसंदर्भांत पत्रव्यवहार केला असून, अद्याप लस मिळाली नाही. लवकरात लवकर पोस्टमन यांना लस मिळावी.

- एस. एस. पाठक, प्रभारी अधीक्षक, डाक घर, सोलापूर

loading image
go to top