esakal | "मुख्यमंत्रीसाहेब, विठ्ठलाच्या महापूजेला येण्याआधी "या' मागण्यांची करा पूर्तता!'
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur

'मुख्यमंत्रीसाहेब, महापूजेला येण्याआधी 'या' मागण्यांची करा पूर्तता!'

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

प्रश्‍न मार्गी लावण्याचा अजेंडा घेऊनच पंढरीत यावे; अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने गनिमीकाव्याने तीव्र आंदोलन करू, असा इशारा महर्षी वाल्मीकी संघाने दिला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला (Pandharpur)) येण्यापूर्वी येथील एमआयडीसी, महाद्वार वेसची पुनर्बांधणी, चंद्रभागेची प्रदूषणमुक्ती, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेतील स्मारक, नगरपालिका करमुक्ती, रस्ते दुरुस्ती व आमचे आदिवासी महादेव कोळी जमातीचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा अजेंडा घेऊनच पंढरीत यावे; अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने गनिमी काव्याने तीव्र आंदोलन करू, असा इशारा महर्षी वाल्मीकी संघाचे (Maharshi Valmiki Sangh) संस्थापक- अध्यक्ष गणेश अंकुशराव (Ganesh Ankushrao) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे. (The Valmiki Sangh demanded that the Chief Minister should fulfill the demands-ssd73)

हेही वाचा: पडळकरांच्या गाडीवर दगड मारणाऱ्या अमितने छातीवर गोंदवले शरद पवार !

श्री. अंकुशराव यांनी या प्रसिद्धिपत्रकात असे नमूद केले आहे, की आदिवासी महादेव कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्‍न आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागा वाळवंटात स्मारक उभारणीचा प्रश्‍न वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेला आहे. चंद्रभागेच्या तीरावरच भक्त पुंडलिकाच्या साक्षीनं मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हा प्रश्‍न सोडवण्याचं आश्‍वासन दिलं होतं; परंतु अद्यापही याची वचनपूर्ती केली नाही. गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात उजनी धरणावरील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अविचाराने धरणातून सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेच्या काठावरील अनेक गावांना आणि पंढरपूर शहरालाही महापुराचा तीव्र तडाखा बसला होता. त्यामुळे यंदा व यापुढे तशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये यासाठी उजनी धरणावरील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

पंढरपूर शहरातील उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला एमआयडीसी नसल्यामुळे काम मिळत नाही. त्यामुळे येथे तातडीने एमआयडीसी व्हावी, श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरासमोर प्राचीन काळाच्या वैभवाची साक्ष देणारी पुरातन महाद्वार वेस काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणात पाडली गेली. तशी वेस पुन्हा बांधावी. याचबरोबर पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे पूर्ण करावीत. कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील यात्रा भरवल्या जात नसल्यामुळे उलाढाल ठप्प झाली आहे. नागरिकांना दैनंदिन गरजा भागवणेही कठीण होत आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेने नागरिकांना करमुक्ती जाहीर करावी. शहरातील वारीवर अवलंबून असलेल्या छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत घोषित करावी आदी मागण्या या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आल्या आहेत.

loading image