उजनी धरण 90 टक्‍क्‍यांवर! धरणातून 'कधी' सोडले जाणार पाणी, वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ujani-Dam

गतवर्षी ठरावीक दिवसांत मोठा पाऊस झाल्याने 20 सप्टेंबरपूर्वी धरण 110 टक्‍क्‍यांवर पोहचले होते.

उजनी धरण 90 टक्‍क्‍यांवर! धरणातून 'कधी' सोडले जाणार पाणी

सोलापूर: सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरणातील पाणीसाठा आता 90 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. गतवर्षी ठरावीक दिवसांत मोठा पाऊस झाल्याने 20 सप्टेंबरपूर्वी धरण 110 टक्‍क्‍यांवर पोहचले होते. बंडगार्डन व दौंडवरून विसर्ग वाढल्यास धरण काही दिवसांत 100 टक्‍क्‍यांची पातळी गाठेल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

ujani dam

ujani dam

हेही वाचा: World Tourism Day 2021 :‘उजनी’तील पक्ष्यांचे होणार टॅगिंग

सध्या उजनी धरणात बंडगार्डनवरून साडेतीन हजार क्‍युसेकचा विसर्ग येत आहे. तर निघोजेवरुन अडीचशे, पारगाववरून दोन हजार 170 तर दौंडवरून तीन हजार क्‍युसेकचा विसर्ग आहे. सोमवारी (ता. 27) रात्री दहा वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 90 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचला होता. उजनी धरण क्षेत्रात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. यंदा उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी खूपच खालावली होती. त्यामुळे उन्हाळ्यातील एक आवर्तन सोडले गेले नव्हते. परंतु, सुरवातीपासूनच कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठा टप्प्याटप्याने वाढत आहे. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी धरणातून चार टिएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते. आता धरण पूर्ण क्षमतेने कधीपर्यंत भरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ujani Dam

Ujani Dam

हेही वाचा: उजनी : दृष्टीहिनतेचे आव्हान पेलवत पुजाची गगनभरारी

उजनी धरणातील पाणीसाठा 100 टक्‍क्‍यांहून अधिक झाल्यानंतर वरुन येणाऱ्या पाण्याचा फ्लो पाहून त्या-त्यावेळी धरणातून नदीद्वारे पाणी खाली सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. तुर्तास तशी परिस्थिती नाही. दोन दिवसांत धरणातील पाणीसाठा 90 टक्‍क्‍यांहून अधिक होईल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर

हेही वाचा: 'उजनी' @ 70.43 % ! पाणीसाठ्यात होतेय वाढ; शेतकऱ्यांमधून समाधान

ठळक बाबी...

- धरणातील सध्याची पाणी पातळी 90 टक्‍के; गतवर्षी याच कालावधीत धरण 110 टक्‍के भरले होते

- धरणाने अजूनपर्यंत धोक्‍याची पातळी ओलांडली नसल्याने नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय नाहीच

- दौंड, बंडगार्डनवरून एकाचवेळी दोन लाख क्‍युसेकचा विसर्ग येऊ लागल्यास धरणाचे उघडणार दरवाजे

- परिस्थिती पाहून भीमा नदीतून खाली सोडले जाईल पाणी; तत्पूर्वी, नागरिकांना दिला जाणार सतर्कतेचा इशारा

loading image
go to top