
वैराग : येथील बार्शी रोडवरील मोटर वायंडिंग वर्कशॉपमधून पावणेदोन लाखांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा घडली. याबाबत शरद शिवाजी गटकळ (रा. काळेगाव) यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.