निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! प्रभाग 17 मध्ये उरले आता आठ रुग्ण; नगरसेवकांनी मानधनातून केली लोकसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

02Child_Mask_0 - Copy.jpg


प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • आतापर्यंत 196 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण रुग्णांपैकी 170 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत आठ रुग्ण 
  • आतापर्यंत प्रभागातील 18 रुग्णांचा झाला मृत्यू 

निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! प्रभाग 17 मध्ये उरले आता आठ रुग्ण; नगरसेवकांनी मानधनातून केली लोकसेवा

 सोलापूर : महापालिकेची मदत घेऊन नगरसेवकांनी स्वत:च्या मानधनातून लोकसेवा केली. प्रभागाची लोकसंख्या 80 ते 90 हजारांपर्यंत असून बहूतांश लोक बांधकाम मजूर आहेत. आतापर्यंत अवघे 196 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्याने आता या प्रभागात केवळ आठ रुग्ण शिल्लक राहिले आहेत. 

जनजागृतीतूनच थांबतोय कोरोनाचा प्रादुर्भाव 
बांधकाम क्षेत्रात काम करणारे, फरशी काम, विटभट्ट्यांवरील मजूरांचा हा परिसर आहे. या परिसरात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर प्रभागातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत, को- मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरणार नाहीत, याची दक्षता घेतली. धान्य वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप करुन प्रतिबंधित क्षेत्रात फवारणी केली. जनजागृतीबरोबरच रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट मोहीमही राबविले. 
- भारतसिंग बडूरवाले, नगरसेवक 


प्रभागातील आडके हॉस्पिटल, जगदंबा चौक, मौलाली चौक, शानदार चौक, शास्त्री नगर, सिध्दार्थ हौसिंग सोसायटी, लोधी गल्ली, जामगुंडी चौक, गुरव वस्ती, कुंभार गल्ली, फकरुद्दीन नगर झोपडपट्टी, प्रकाश बापू सोसायटी येथील बहुतांश नागरिक मोलमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. या प्रभागातील को- मॉर्बिड रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर नगरसेविका नूतन गायकवाड, जुगनबाई आंबेवाले, नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, रवी कय्यावाले यांनी मोठी गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली. तर त्यांच्या त्यांच्या भागात जनजागृतीवर भर देत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. काहींनी गरजूंना धान्य वाटप केले, तर काहींनी संशयितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी नियोजन केले. सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये हा प्रभाग अव्वल राहिला आहे. आता हा प्रभाग रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने काही नगरे तथा झोपडपट्ट्या कोरोनामुक्‍त झाल्याचेही नगरसेवकांनी सांगितले. रवी कय्यावाले यांनी स्वत:चे मानधन सामाजिक बांधलिकी म्हणून नागरिकांसाठी दिले. 


प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • आतापर्यंत 196 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण रुग्णांपैकी 170 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत आठ रुग्ण 
  • आतापर्यंत प्रभागातील 18 रुग्णांचा झाला मृत्यू 


नागरिकांनी हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई 
लहान मुले, वयस्क लोक सुरक्षित रहावेत, यासाठी विशेष जनजागृती केली. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास निश्‍चितपणे कोरोनाला आपण हद्दपार करू, असा विश्‍वास नागरिकांमध्ये निर्माण केला. लोधी गल्लीत दाट वस्ती असतानाही कोरोना पसरला नाही. नऊ हजार दोनशे रुपयांच्या मानधानातून लोकसेवा केली. प्रभागातील कोरोना वाढला नाही, याचे समाधान आहे. 
- जुगनबाई आंबेवाले, नगरसेविका 

loading image
go to top