esakal | तांबेरा रोगामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

तांबेरा रोगामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पशुधन पालक शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे.

तांबेरा रोगामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर): गतवर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुधाच्या दरात प्रचंड घट झाली. असे असताना मध्यंतरी झालेल्या पावसाने कडवळ पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पशुधन पालक शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे.

हेही वाचा: सुरक्षारक्षक देतोय केसपेपर! वडाळा ग्रामीण रुग्णालयात क्लार्कची मनमानी

माळशिरस तालुक्‍यात शेतीपुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी जनावरे असतात. या दुभत्या जनावरांच्या दुध वाढीसाठी पोषक तत्त्व असणारा हिरवा चारा आवश्‍यक असतो. म्हणून शेतकऱ्यांनी चारा पिकाचे नियोजन केलेले असते. चारा पीक साधारण अडीच ते तीन महिन्यात खाण्यायोग्य होते. त्यानुसार सतत हिरवा चारा मिळावा, यासाठी शेतात टप्प्याटप्प्याने चारा पीक घेतले जाते. काही शेतकरी आपल्या जनावरांसाठीचा चारा ठेऊन अतिरीक्त चारा एक ते दीड हजार रूपये प्रतिगुंट्याप्रमाणे विकत असतात. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लावलेले कडवळ पीक हे मध्यंतरी पडलेल्या छोट्या-मोठ्या पावसाने व वाऱ्याने जमिनीवर पडल्याने जनावरांसाठी खाण्यास अयोग्य बनले आहे. परंतु अन्य चारा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव पशुपालक तोच निकृष्ट प्रतीचा कडवळ चारा दुभत्या जनावरांबरोबरच भाकड जनावरांसाठी वापरत आहेत. त्यामुळे दुध उत्पादनात घट होत आहे.

हेही वाचा: "पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी"

दूधवाढीसाठी आणि शरीर पोषणासाठी उपयुक्त ठरणारे मक्‍याचा भरडा, भुस्सा, पेंड, कळणा, तांब आदिंचे बाजारपेठेतील दर गगणाला भिडले आहेत. यातच मध्यंतरी सलग तीन दिवस रिमझिम पाऊस झाला. परंतु हा पाऊस अतिशय बारीक असल्याने पावसाचे पाणी पीकांच्या पानावरच साठले. जमीन पुरेशी ओलीही झाली नाही व वातावरण रोगट बनले. त्यामुळे पडलेल्या तांबेरा रोगामुळे येत्या दीड ते दोन महिन्याभरात येणारे कडवळ चारा पीक वाया जाईल आणि दुसरे चारापीक ऊभे करेपर्यंतच्या कालावधीत ओला चारा म्हणून काय घालायचे असा मोठा प्रश्न पशुपालकांपुढे उभा ठाकला आहे.

हेही वाचा: स्वतःला वगळूनच महिलांचं टाईम मॅनेजमेंट!

कडवळ चारा पीक प्रतिगुंठा एक ते दीड हजार रुपये या दराने विक्री होत असते. तेच पीक पावसाने पडल्याने निकृष्ट प्रतीचे बनलले. त्यामुळे त्यास पाचशे रुपये प्रतिगुंठा असा दर मिळत आहे.

- आकाश भाग्यवंत नायकुडे, दुध उत्पादक शेतकरी, संग्रामनगर-अकलूज

loading image
go to top