esakal | स्वतःला वगळूनच महिलांचं टाईम मॅनेजमेंट!
sakal

बोलून बातमी शोधा

Women Empowerment

'स्त्री'च्या संपूर्ण जीवनात नोकरी ही कायम पहिल्यास्थानीच राहिलेली आहे. त्यामुळे आपसूकच कुटुंब, मुलांचे शिक्षण हे दुसऱ्याच स्थानावर गेले.

स्वतःला वगळूनच महिलांचं टाईम मॅनेजमेंट!

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सोलापूर: आज महिला अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि कित्येक ठिकाणी उच्च पदावर आहेत. महिला उच्च पदावर असो की कनिष्ठ पदावर सर्वांच्या समस्या मात्र सारख्याच आहेत. टाईम मॅनेजमेंट हीच मुळात तारेवरची कसरत आहे. दिवसभरातील दहा तास तरी ऑफिसच्या परिवारातच जातात. आता ऑनलाइन शाळांनी तर नोकरदार महिलांचे टाइम मॅनेजमेंट चुकविलेच आहे. नोकरी, कुटुंब आणि मुलांची शिक्षिका अशा तिहेरी जबाबदाऱ्यांमुळे स्वतःला वगळूनच तिचं शेड्यूल ठरलेलं असतं. दहा तास नोकरीसाठी, दोन तास मुलांसाठी, दोन तास कुटुंबासाठी मग त्यानंतर स्वतःसाठी तिला वेळच मिळत नाही. दिवसभराच्या व्यापामुळे स्वत:साठी स्टॅमिनाही राहिलेला नसतो. त्यामुळे "स्त्री'च्या संपूर्ण जीवनात नोकरी ही कायम पहिल्यास्थानीच राहिलेली आहे. त्यामुळे आपसूकच कुटुंब, मुलांचे शिक्षण हे दुसऱ्याच स्थानावर गेले.

हेही वाचा: गणपती विसर्जन करताना युवक वाहून गेला! अद्याप बेपत्ता

राजकीय, शासकीय अन्‌ इतर विविध क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. आज शैक्षणिक प्रगतीची उंची वाढली आहे. तिच्या आर्थिक सक्षमतेसाठी, स्वःविकासाच्यादृष्टीने सुशिक्षित होणे, नोकरी करणे ही आता काळाची गरज बनली आहे. मात्र कुटुंबाला "स्त्री'विना शोभा नाही, हे देखील तितकेच खरे आहे. दररोज नाही पण प्रत्येक सण-उत्सवाला तरी "ती'ने घराची शोभा वाढवावी, असे कुटुंबातील सदस्यांना वाटते. परंतु, नोकरीची ध्येयपूर्ती करताना कुटुंबातील अपेक्षांना दुय्यम स्थानावर ठेवले जात असल्याचे चित्र आहे. नोकरीत तडजोड चालत नाही. त्यामुळे परिवारातील सदस्यांना ऍडजेस्टमेंटची तयारी दाखवावी लागते. आठवड्याची सुट्टी परिवारासोबत घालविण्याचे नियोजन मात्र केले जाते. दिवसातील बहुतांश वेळ हा ऑफिसमध्ये जात असल्याने तेथील सहकारी, कर्मचारी यांच्यासोबतही आपोआप एक पारिवारिक नातं विणलं जातं असतं. त्यामुळे माहेर, सासरच्या कुटुंबामध्ये कर्मभूमी कुटुंबाची भर पडते. धावपळ होते, मात्र जबाबदारी पार पाडल्याचे एक वेगळे समाधानदेखील मिळते.

हेही वाचा: सोलापूर: विसर्जन दिवशी गणेश मूर्ती संकलनासाठी शहरात शंभर केंद्रे

दिवसातील अकरा तास कामासाठी

प्रशासन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून कामकाज होत असते. काम, मिटिंग, मंत्र्यांचे दौरे, भेटीगाठी अशा एक ना अनेक विषयांमुळे कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ ऑफिसच्या कामकाजाला द्यावा लागतो. माझा दिनक्रम पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होतो. व्यायाम, त्यानंतर मुलांचं दिवसभराचं शेड्युल्ड मग ऑफिसची तयारी. ऑफिसमधून आल्यानंतर मुलांचा अभ्यास मग जेवण-खाणं. असं हे दिवसभराचं शेड्युल्ड ठरलेलच असतं. हे दिनक्रमाचं टाईम मॅनेजमेंट पाहता स्वत:साठी वेळच मिळत नाही. नोकरी हेच दैवत म्हणून प्राधान्यक्रमावर राहते.

- चंचला पाटील, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी

हेही वाचा: सोलापूर : वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण

दिवसाचे बारा तास जनतेसाठी

शिक्षणाची लेवल वाढली आहे. त्यामुळे महिला नोकरदार परिवारामध्ये एक ऍडजेस्टमेंट करण्याची मानसिकताही आपोआप तयार झाली आहे. सकाळी सहा वाजता दिनक्रम सुरू होतो. पण नगरसेवक, नागरिक यांचा कधी फोन येईल, कशासाठी येईल याचा काही नेम नसल्याने आठ वाजल्यापासून ऑफिससाठी तयार होऊन बसते. सायंकाळी घरी गेल्यावरदेखील कामानिमित्त नागरिकांचे फोन येणे चालूच असतात. अगदी रात्रीचे जेवण संपण्यापूर्वी मुलांच्या अभ्यासाची थोडीफार विचारणा होते. संपूर्ण दिवस हा ऑफिस, नागरिक यांच्यासाठी खर्च होते. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढायचा असेल तर सुट्टीच्या दिवशीच. दुर्दैवाने कुठे पाण्याची पाईपलाईन फुटली तर ती सुट्टी गेलीच म्हणायचे. पण हे सगळ करताना नोकरीच्या माध्यमातून केलेली जनतेची कामे हा एक वेगळा आनंद देणारा असतो.

- सारीका अकुलवार, विभागीय अधिकारी, सोलापूर महापालिका

हेही वाचा: सोलापूर-मोहोळ महामार्गावर पेटली कार! गाडीमधील तिघे सुरक्षित

थोडक्‍यात पण महत्त्वाचे

- नोकरीमुळे घरातील स्वयंपाक खोलीतून बहुतांश महिलांना सुटका मिळाली आहे. घरकामासाठी एखादी मावशी ठेवण्याची आर्थिक क्षमता तिला मिळाल्याने नोकरीच्या ठिकाणातील जबाबदाऱ्या पूर्ण पाडू शकतात

- सण, उत्सव, घरातील लग्नसमारंभात ऍडव्हान्स नाही गेलो तरी उपस्थिती महत्त्वाची वाटते

- सजायला, आवरायला वेळ नाही मिळाला तरी परंपरेचा भाव ती पुढे नेतच असते

- कितीही धावपळ झाली तरी आर्थिक सुबतेमुळे तिचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे

loading image
go to top