esakal | मनोहरमामाच्या राजकीय भक्तांची गोची !
sakal

बोलून बातमी शोधा

मनोहरमामाच्या राजकीय भक्तांची गोची!

उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहरमामा भोसले यांच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी हा गेली दोन-चार वर्षांपासून करमाळा तालुक्‍यात चर्चेचा विषय आहे.

मनोहरमामाच्या राजकीय भक्तांची गोची!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उंदरगाव (Undargaon) (ता. करमाळा) (Karmala) येथील मनोहरमामा भोसले (Manoharmama Bhosle) यांच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी हा गेली दोन-चार वर्षांपासून करमाळा तालुक्‍यात चर्चेचा विषय आहे. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख (Political Leaders) नेते उंदरगाव (ता. करमाळा) येथे मनोहरमामाच्या दर्शनासाठी येत असल्याची कायम चर्चा होती. मनोहरमामा आता वादग्रस्त ठरल्यानंतर अनेक बड्या-बड्या नेत्यांबरोबरची त्यांची छायाचित्रे सोशल मीडियातून पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींवर मार्ग सांगणारे मनोहरमामा अलीकडच्या काळात मात्र ते सर्वसामान्यांचे न राहता धनदांडग्या उद्योगपती, सिनेकलाकार, राजकारणी (Political) यांचे गुरू झाले होते. मात्र, आता या सर्व बड्या भक्तांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.

हेही वाचा: 'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?

गेल्या काही दिवसांमध्ये उंदरगाव आणि मनोहरमामा चांगलेच चर्चेत आले आहेत. मनोहरमामा भोसले यांच्या नातेवाइकांनीच आता त्यांच्या उंदरगाव येथील मठात चालणाऱ्या घटनांबद्दल बाहेर उघडपणे बोलण्यास सुरवात केली आहे. मनोहर मामाच्या मठात होणारी भाविकांची गर्दी, येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंग व्यवस्थेचे प्रश्न, येण्या- जाण्याच्या रस्त्यावर होणाऱ्या अडचणी अशा किरकोळ कारणावरून स्थानिक पातळीवर मनोहरमामाचे त्यांच्याच जवळच्या नातेवाइकांशी मतभेद वाढत गेले. या मतभेदाचे रूपांतर काय झाले हे आज आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे.

बाळूमामांची समाधी असलेल्या अदमापूर (जि. कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन उंदरगाव (ता. करमाळा) येथे मनोहरमामा हे बाळूमामांच्या नावाखाली पैसे गोळा करत असल्याचा निषेध करत चौकशीची मागणी केली आणि उंदरगाव येथील मनोहरमामाच्या मठाकडे संशयाची सुई वळली. यातूनच आज हे सर्व प्रकरण चव्हाट्यावर आले असताना मनोहर मामाकडे राजकीय सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या अनेक राजकारण्यांची मात्र पंचाईत झाली आहे.

हेही वाचा: दादाचं पक्षांतर अन्‌ जमा-खर्चाचा हिशेब !

करमाळा तालुक्‍यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी मनोहरमामा यांच्या मठात हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. याशिवाय राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा या पक्षातील प्रमुख जबाबदार नेते असतील, त्यांनी देखील मठात हजेरी लावली आहे तर काही राजकारण्यांच्या घरी जाऊन महाराजांनी दर्शन दिले आहे. आता मात्र महाराजांवर होत असलेल्या आरोपांमुळे या राजकीय भविष्य जाणून घेणाऱ्या राजकारण्यांची मात्र पंचाईत झाल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी महाराजांच्या सांगण्यावरून राजकीय वाटचाल सुरू केली आहे, अशा अनेक राजकारण्यांची आता अडचण होऊन बसली आहे. मनोहरमामांचा सल्ल्यावरून अनेकांना मंत्री, आमदार व्हायचे होते. तर कुणी नव्याने राजकारणात प्रवेश करून राजकीय भवितव्य आजमावू पाहणार आहे, तर कुणाला अधिकाऱ्याची पोस्ट हवी आहे. आशा लोकांची पुढील भूमिका काय? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

loading image
go to top