कोरोनाची ऐशीतैशी ! मांगूर मासे लुटण्यासाठी कंबर तलाव परिसरात झुंबड

कंबर तलाव परिसरात नागरिकांची मासे पकडण्यासाठी झाली गर्दी
Kambar talav
Kambar talavCanva

सोलापूर : शहरात कोरोनाची (Covid-19) स्थिती बिकट असताना, वाढती रुग्णसंख्या प्रशासनास तापदायक झालेली असताना व कडक लॉकडाउन असतानाही नागरिकांना त्याचे गांभीर्य राहिलेले दिसून येत नाही. अशातच शनिवारी (ता. 8) कंबर तलाव (छत्रपती संभाजी महाराज तलाव) (Chhatrapati Sambhaji Maharaj Lake) परिसरातील घाण पाण्याच्या चिखलात मांगूर जातीचे मासे लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली अन्‌ कोरोना नियमांची ऐशीतैशी करत नागरिकांनी पोलिसांना न जुमानता माशांची लूटमार केली. (There was a crowd of citizens fishing in the area of Kambar Lake

येथील कंबर तलाव परिसरात मासे पकडण्यासाठी नागरिकांची शनिवारी झुंबड उडाली. हुबळीहून नागपूरला मांगूर जातीचे मासे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा कंबर तलाव परिसरात कंट्रोल सुटल्याने अपघात झाला अन्‌ त्यात साधारण दोन टन मासे कंबर तलाव परिसरातील सांडपाण्यात पडले. त्यानंतर सकाळपासून घाण सांडपाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी नागरिकांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र या परिसरामध्ये आहे.

इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

Kambar talav
इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

सोलापूर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतोय तर दुसरीकडे नागरिकांनी मासे पकडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजवले आहेत. यामध्ये कोणत्याही नागरिकाच्या तोंडाला मास्क नसल्याचं दिसून आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले अन्‌ नागरिकांना हुसकावण्यात आले. पण नागरिक ऐकण्याच्या तयारीत दिसत नव्हते. त्यामुळे मासे पकडण्यासाठी झालेल्या या गर्दीवर कारवाई होणार का, हा प्रश्न आहे.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com