esakal | तीन महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग ! नाकाबंदी लावली, तरीही चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

तीन महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग ! नाकाबंदी लावली, तरीही चोरी

25 ते 30 वयोगटातील दोन तरुणांनी दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

तीन महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग! नाकाबंदी लावली, तरीही चोरी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गौरी आगमनानिमित्त महिला अंगावर दागिने घालून एकमेकींच्या घरी लक्ष्मी दर्शनासाठी ये-जा करतात, याचा अंदाज घेऊन 25 ते 30 वयोगटातील दोन तरुणांनी दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याच्या (Chain Snatching) घटना घडल्या आहेत. (Solapur Crime) एमआयडीसी परिसरात हा प्रकार झाल्यानंतर जुना पूना नाका परिसरात नाकाबंदी लावण्यात आली. त्याला हुलकावणी देऊन चोरट्यांनी (theft) मडकी वस्ती परिसरात तसाच प्रकार करून पोबारा केला.

हेही वाचा: 'उजनी' @ 70.43 % ! पाणीसाठ्यात होतेय वाढ; शेतकऱ्यांमधून समाधान

जुना कुंभारी नाका ते मुमताज नगराकडे महानंदा मल्लिकार्जुन घोडके (रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) या चालत जात होत्या. त्या वेळी मागून एक दुचाकी आली आणि त्या दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने महानंदा घोडके यांच्या गळ्यातील बोरमाळ, गंठण, लक्ष्मी हार, सेव्हन पीस व मंगळसूत्राला हिसका दिला. त्यात सेव्हन पीस व मंगळसूत्रातील अंदाजित 12 हजारांचे दागिने चोरून ते दुचाकीस्वार पळून गेल्याची फिर्याद त्यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पेटकर हे करीत आहेत. दुसरीकडे, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गणेश नगर, मडकी वस्ती परिसरातून बबिता आगलावे (रा. प्रतीक नगर, मुरारजी पेठ) यांच्या गळ्यातील मिनी गंठण हिसका मारून चोरट्यांनी लांबविले, अशी फिर्याद त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत मंडले हे तपास करीत आहेत.

तिन्ही घटनांची हकीकत एकच

जुना कुंभारी नाका ते मुमताज नगरातून पायी जाताना महानंदा घोडके यांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्यांचे वर्णन आणि मडकी वस्ती परिसरात चोरी झालेल्या बबिता आगलावे यांच्या फिर्यादीत एकच हकीकत आहे. चोरट्यांचे वय 25 ते 30 होते आणि त्यांनी काळ्या रंगाच्या पल्सर गाडीचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, बबिता आगलावे या सणानिमित्त आईला भेटण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मुलगा हे दोघे दुचाकीवरून मार्डी, वडगाव येथे निघाल्या होत्या. रूपाभवानी मंदिर ते डी-मार्टच्या सर्व्हिस रोडवरून दुचाकीवरून जाताना मंजुळा तुकाराम शिंदे (रा. रामराज नगर, शेळगी) यांच्या गळ्यातील 58 हजारांचे दागिने हिसकावले. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक तळे हे पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top