esakal | शहर-ग्रामीणमध्ये आज लसीकरण नाही ! जिल्ह्याला अजून 50 लाख डोसची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

शहर-ग्रामीणमध्ये आज लसीकरण नाही! जिल्ह्याला अजून 50 लाख डोसची गरज

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

शहरातील लस संपल्याने आज (सोमवारी) शहरातील सर्वच केंद्रांवरील लसीकरण बंद राहील, असे महापालिकेने कळविले आहे.

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील तब्बल 35 लाख 78 हजार 32 जणांना लस टोचण्याचे टार्गेट आहे. त्यापैकी सहा लाख 58 हजार 800 जणांना कोरोनावरील (Covid-19) प्रतिबंधित लसीचा (Covid Vaccine) पहिला डोस देण्यात आला आहे. तर त्यापैकी एक लाख 99 हजार 71 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. दरम्यान, शहरातील लस संपल्याने आज (सोमवारी) शहरातील सर्वच केंद्रांवरील लसीकरण (Vaccination) बंद राहील, असे महापालिकेने कळविले आहे. (There will be no vaccination in urban and rural areas today-ssd73)

हेही वाचा: "एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना होऊनही संबंधित रुग्ण सहजपणे बरा होतो. दोन्ही डोस घेतलेले कोरोनाचे बळी ठरत नाहीत, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य विभागाने (Central Health Department) नोंदविले आहे. या पार्श्‍वभूमीवर लस टोचून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. पहाटेपासून नागरिक टोकन घेण्यासाठी लसीकरण केंद्रांबाहेर (Vaccination center) गर्दी करीत आहेत. तरीही, लस मिळत नाही. मागणीच्या प्रमाणात लस मिळत नसल्याने अनेकांना इच्छा असूनही लस घेता येत नसल्याची वस्तुस्थिती शहर-ग्रामीणमध्ये आहे. आतापर्यंत शहरातील दोन लाख 13 हजार 367 जणांनी पहिला डोस तर त्यातील 60 हजार 804 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीअभावी वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. आता गर्भवती महिला, दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्यांना लस देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील तरूण, 45 वर्षांवरील को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले रुग्ण) आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्रामीणमधील चार लाख 45 हजार 433 जणांना पहिला तर एक लाख 38 हजार 267 जणांना दुसरा डोस मिळाला आहे.

शहर-ग्रामीणसाठी एकावेळी लसीचे 50 ते 60 हजार डोस मिळावेत, अशी मागणी केली आहे. लस मिळाल्यानंतर गरोदर माता यांच्यासह दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेतील व्यक्‍तींना प्राधान्याने लस दिली जाईल. त्यानंतर उर्वरित लस पहिल्या डोससाठी वापरण्याचे नियोजन आहे.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, समन्वयक, लसीकरण, सोलापूर

हेही वाचा: भाजपची सांगोला तालुका जम्बो कार्यकारिणी जाहीर

लस घेऊन जाण्याचा निरोप नाहीच

सोलापूर जिल्ह्यासाठी पुण्यावरून लस मिळते. वारंवार लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेकदा लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लस मिळाल्यानंतर आता संबंधित तालुक्‍यांना तत्काळ लस मिळावी आणि लसीकरण सुरू व्हावे म्हणून टेंभुर्णीतून माढा, बार्शी, करमाळा, पंढरपूर व माळशिरस तालुक्‍यांना लस वितरीत केली जात आहे. तर पंढरपूरमधून मंगळवेढा व सांगोल्याला लस पाठविली जाते. दरम्यान, पुण्यावरून लस घेऊन जाण्याबद्दल अजूनही निरोप नसल्याचेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

loading image