

Staff Protest Intensifies; Officials’ Work Also Affected Amid Ongoing Strike
sakal
सोलापूर : आज सलग तिसऱ्या दिवशी विविध शासकीय कार्यालयांत शुकशुकाट दिसला. गट ‘क’ व गट ‘ड’ मधील जवळपास ९० टक्के कर्मचारीच संपावर गेल्याने ऑफिसमधील साहेबांचेही काम होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांची संख्याही घटली आहे. संप कधी मिटणार? याबद्दल कोणाकडेही ठोस उत्तर नसल्याने सध्या तरी शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. अनेक कार्यालयांतील काही शाखांच्या कार्यालयांना अक्षरश: कुलूप लावण्यात आले आहे. संपावरील कर्मचाऱ्यांनी आज दुपारपर्यंत जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला होता.