
मंगळवेढा(सोलापूर)ः केंद्र शासनाच्या श्रावणबाळ व राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेच्या लाभासाठी 18 वर्षांपूर्वीच्या दारिद्ररेषेखालील यादीचा आधार घेतला जात असल्यामुळे नव्याने समावेश झालेली कुटुंबे मात्र अद्यापही जुन्या निकषामुळे वाऱ्यावर आहेत.
श्रावण बाळ योजना व राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेच्या लाभासाठी विहीत नमुन्यातील अर्जाबरोबर सन 2002 ते 07 या वर्षातील दारिद्रय रेषेखालील यादीत नाव असलेल्या दाखल्याची अट करण्यात आली. या यादीतील पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे तर यातील काही लाभार्थी मयत झाले. नव्याने सन 2011 मध्ये आर्थिक व सामाजिक जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र या यादीतील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मात्र संजय गांधी, श्रावणबाळ व राष्ट्रीय वृद्धापकाळ येण्याचा लाभ दिला जात नसल्यामुळे शासनाच्या उदासीन कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी 21 हजार रुपये उत्पन्नाची अट निश्चित करण्यात आल्यामुळे विधवा महिला, अनाथ मुले, परितक्ता महिला, अत्याचार महिला, तृतीय पंथी, दुर्धर आजार ग्रस्त, देवदासी, अपंग, मतीमंद, यांना दिलेल्या उत्पन्नाचा दाखल्याची मंडल अधिकारी चौकशीत विलंब होत असल्याने या योजनेचा लाभ न घेतलेला बरा अशी मानसिकता झाली.सध्या तालुक्यांमध्ये हे अंतोदय, बीपीएल कार्डधारकांची उत्पन्नाचा उत्पन्न 25 हजाराच्या आत गृहीत धरले जाते परंतु केशरी कार्डधारकांना 25 हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न गृहीत धरले जात आहे बहुतांशी केशरी कार्डधारकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अडचण ठरत आहे तरी त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी,नोकरदारांना कामाप्रमाणे वेतन आयोग लागू होतो त्याप्रमाणे मजुरांना देखील त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्यामुळे उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची गरज आहे
बदलाची मागणी करणार
नवीन सन 2011 यादीतील लाभार्थाला लाभ देण्यासाठी व उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे.
- आ.भारत भालके,आमदार पंढरपूर-मंगळवेढा
उत्पन्नाची अट रद्द करावी
अपंगासाठी पुर्वी 21 हजार रुपये उत्पन्नाची अट होती ती अट रद्द करून 50 हजार रूपये उत्पन्न अट केली. त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या योजनेच्या लाभासाठी 50 हजार रूपये उत्पन्न ची अट करण्यात यावी.
- बिरूदेव घोगरे , माजी सदस्य निराधार योजना.
लाभापासून वंचित राहण्याची वेळ
2002 ते 07 दारिद्रयरेषेखालील यादीचा लाभार्थी निवडताना निकष लावला जातो तो रद्द करून नवीन सन 2011 च्या यादीचा निकष लावला तर आम्हाला न्याय मिळू शकेल. केवळ जुन्या निकषामुळे लाभार्थी वंचित राहत आहे.
मंगल कळकुंबे, वंचित लाभार्थी .
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.