
सोलापूर: देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगून होटगी येथील सराफ दुकान फोडणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व वळसंग पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्यांकडून पोलिसांनी पिस्टल, चोरीची चारचाकी व ४९ हजार रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.