
सोलापूर: अक्कलकोट रस्त्यावरील साई नगरातील शरणू शिवराय हांडे (वय ३६) याच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी दोघांना कर्नाटकातून एकाला सोलापुरातून अशा एकूण तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना न्यायालयाने मंगळवारी (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तर एकास रविवारी (ता. १०) न्यायालयात उभे केले जाणार आहे.