महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (Maharashtra Road Development Authority) सादर केलेल्या ४८ पानी अहवालातून प्रथमच या महामार्गाची सर्वाधिक तपशीलवार माहिती समोर आली आहे.
सोलापूर : शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १३६ गावांना फटका बसणार आहे.