

Major Fire Breaks Out in Adhiw; Three Shops Burnt, Investigations Underway
Sakal
पंढरपूर : आढीव येथे मंगळवारी (ता. १८) सकाळी ३ दुकाने आगीत जळून खाक झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये वेल्डिंग फॅब्रिकेशन, ऑटो गॅरेज, दूध डेरी, चहाचे कप बनवणारे दुकान, अशा ३ दुकानांना मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किटमुळे साडेअकराच्या सुमारास आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.