
वैराग : वैराग परिसरात वाघाने सलग तिसऱ्या दिवशी उपळे दुमाला येथे रेडकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वैराग भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.