
पांगरी: येडशी अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात दोन जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. कंपार्टमेंट क्रमांक १९२ मध्ये गेलेल्या बैल आणि गायीवर वाघाने हल्ला केला असून यात दोन्ही जनावरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत भानसगाव (ता. धाराशिव) येथील शेतकरी विशाल बालाजी गवळी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.