

सोलापूर: मागील वर्षभरापासून रामलिंग अभयारण्य परिसरात वावरणाऱ्या वाघाचे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. धामणगाव (दु.) (ता. बार्शी) येथील शेतकरी बालाजी महादेव मसाळ यांच्या जर्सी गायीची वाघाने शिकार केल्याची घटना शनिवारी (ता.१३) उघडकीस आली आहे.