
-अरविंद मोटे
सोलापूर: धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरात दहा महिन्यांपासून अधिवास तयार केलेल्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी दोन जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या टायगर सेलची स्थापना झाली होती. ‘वाघ संनियंत्रण समिती’ असे नामकरण करण्यात आलेला हा सेल एकही बैठक न घेता सध्या निद्रिस्त आहे. दुसरीकडे तुळजापूरहून काटओढामार्गे उत्तर सोलापूर तालुक्यात आलेला वाघ मोहोळ, माढा तालुक्यातून आता बार्शी तालुक्यात मुक्कामी आहे.