माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट; आदेश पारित

शासनाने माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना जाहीर केली व तसा आदेश निर्गमित केला.
ex servicemen
ex servicemenEsakal

टेंभुर्णी (सोलापूर) : माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक विधवा किंवा पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत चंचल पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना आदेशित केले असल्याची माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पुणे विभागाचे सचिव हनुमंत कुंभार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करणाऱ्या भारतीय संरक्षण दलाच्या सेवेतील माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यासाठी शासनाने माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना जाहीर केली व तसा आदेश निर्गमित केला. त्या आदेशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील माजी सैनिक, सैनिक विधवा किंवा पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देणाऱ्या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पुणे विभागाचे सचिव यांनी हनुमंत कुंभार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी माजी सैनिक, सैनिक विधवा किंवा पत्नी यांना माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना आदेशित केले आहे. त्याप्रमाणे बार्शीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक स्तरावर केलेल्या कार्यवाहीची प्रत हनुमंत कुंभार यांनी मिळाली असल्याचे सांगितले.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक महाराष्ट्रात जन्मलेला असून सलग पंधरा वर्ष रहिवासी असावा. करमाफी पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडून प्रमाणपत्र सादर करावे लागेल. राज्यातील एकाच मालमत्तेकरिता करमाफीस पात्र राहील, असे सदर आदेशात नमूद केले असल्याचे हनुमंत कुंभार यांनी सांगितले. सदर योजनेची तातडीने कार्यवाही केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत चंचल पाटील बार्शीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांचे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे हनुमंत कुंभार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com