
Waterlogged roads and flooded Pitapur and Shirsi bridges in Akkalkot after heavy rainfall.
Sakal
अक्कलकोट: तालुक्यात रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान पडलेल्या पावसामुळे तसेच धाराशिव जिल्ह्यातील पावसामुळे बोरी नदीत पाणी वाढले. अक्कलकोट तालुक्यात पुन्हा पुरस्थिती निर्माण झाली असून चार ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. तसेच हन्नूर भागातील पितापूर गावाच्या पुलावरून पाणी वाहत आहे. कुरनूर धरणातून पुन्हा २२०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून बोरी नदीकाठच्या नागरिक व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.