esakal | अक्कलकोटला येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच पर्यटन निवास सेवेत
sakal

बोलून बातमी शोधा

अक्कलकोटला येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी !

अक्कलकोटला येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी !

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास देश-विदेशातून वर्षभर लाखो भाविक भेट देतात.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या (Shri Swami Samarth) दर्शनास देश- विदेशातून वर्षभर लाखो भाविक भेट देतात. त्या भाविकांना येथे राहता यावे आणि त्यांचा अक्कलकोटचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी येथे पर्यटन निवास बांधले गेले आहे. मात्र, येथील काही कामे अपूर्ण होती. त्यामुळे पूर्ण झालेले बांधकाम वापरात येत नाही आणि अपूर्ण बांधकाम व इतर सुविधा देण्यासाठी निधीची आवश्‍यकता होती. ही सर्व कामे कोरोनामुळे (Covid-19) थंडावली होती. आता निर्बंध शिथिल झाल्याने पूर्ण झालेल्या खोल्या व इतर काही आवश्‍यक सुविधा वापरता याव्यात यासाठी मंगळवारी पर्यटन विकास विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे (Deepak Harne, Regional Manager, Tourism Development Department) यांनी अक्कलकोटला भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने हे पर्यटन निवास खुले करण्यासाठी प्रलंबित कामांची पाहणी करून ते मार्गी लावण्यासाठी नियोजन केले. (Tourist accommodation for devotees coming to Akkalkot will start soon-ssd73)

हेही वाचा: दरबार जनतेचा, अजितदादांपर्यंत पोहोचण्याचा !

गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वास जाण्याच्या प्रतीक्षेत असलेले अक्कलकोट येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (Maharashtra State Tourism Development Corporation) पर्यटक निवास आता महिनाभरात भाविकांच्या स्वागतास सज्ज होऊन सेवेत रुजू होणार असल्याची माहिती हरणे यांनी या वेळी दिली. पर्यटक निवास बांधून तयार आहे, पण ते सुरू करण्यासाठी आवश्‍यक अंतर्गत सोयीसुविधांची कमतरता होती. ती आता दूर होत आहे. पहिल्या टप्प्यात सात वातानुकूलित खोल्या तर पुढील टप्प्यात दोन बहुउद्देशीय सभागृहे भाविकांसाठी खुली केली जाणार आहेत. त्यानंतर तिथे एक उत्तम दर्जाचे उपाहारगृह देखील सुरू केले जाणार आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत परिसर हा खूपच अस्वच्छ आहे, तो पूर्णतः निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक असून ते केले जाणार असल्याचे हरणे यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती वेबसाईट, फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पर्यटक निवास सुरू झाल्यानंतर इथे मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

हेही वाचा: माजी महापौर सपाटेंविरुद्ध 'या' कारणामुळे फसवणुकीचा गुन्हा!

एमटीडीसी बुक केल्यास विविध सवलती

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पुणे विभागामध्ये सुरू असलेली पर्यटक निवासे : महाबळेश्वर (Mahabaleshwar, माथेरान (Matheran), माळशेज घाट (Malshej Ghat), पानशेत (Panshet), कार्ला (लोणावळा) (Lonawala), कोयनानगर (Koynanagar), भीमाशंकर तसेच किल्ले सिंहगड (Sinhagad) आणि अक्कलकोट पर्यटक निवास लवकरच सुरू होत आहेत. यातून ज्येष्ठ नागरिकांना 20 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, शासकीय कर्मचाऱ्यांना 10 टक्के सवलत, आजी व माजी सैनिकांना 10 ते 20 टक्के सवलत, ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्या बुक केल्यास 20 टक्के सवलत अशा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

अक्कलकोट पर्यटन निवासात होणारी कामे

  • मुख्य रस्त्यापासून पर्यटक निवासाला जोडणारा रस्ता

  • पर्यटक निवासात वाहनतळ तयार करणे

  • पर्यटक निवास परिसर स्वच्छता करणे

  • पर्यटक निवासातील अंतर्गत रस्ते पूर्ण करणे

  • स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण करणे

loading image